इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अरुणाचल प्रदेशातील पासीघाट येथील कृषी महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापकाला एका खाजगी व्यक्तीकडून ५५ हजार रुपयांची लाच घेताना अटक केली आहे.
सीबीआयने २३ जुलै रोजी अरुणाचल प्रदेशातील पासीघाट येथील कृषी महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक, एका खाजगी कंपनीतील खाजगी व्यक्ती आणि अज्ञात इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सरकारी सेवकाने कंत्राट देण्याच्या आणि सरकारी सेवकाकडून देयके सोडण्याच्या बदल्यात खाजगी व्यक्तीकडून लाच मागितल्याच्या आरोपावरून सीबीआयने सापळा रचला आणि दोन्ही आरोपींना अटक केली.
२३ जुलै रोजी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आणि सध्या ते पोलिस कोठडीत आहेत. आरोपींची झडती घेतली जात असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.