इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने तक्रारदाराकडून ३ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी उज्जैन येथील केंद्रीय नार्कोटिक्स ब्युरो (सीबीएन) च्या एका अधिकाऱ्याला आणि त्याच्या मध्यस्थाला अटक केली आहे.
सीबीआयने तक्रारदाराकडून त्याच्या मध्यस्थामार्फत लाच मागितल्याच्या आरोपावरून आरोपींविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल केला. सीबीआयने १७ जुलै रोजी सापळा रचला आणि अधिकारी, सीबीएनच्या वतीने तक्रारदाराकडून ३ लाख रुपयांची लाच घेताना त्या मध्यस्थाला रंगेहाथ पकडले. सदर सीबीएन अधिकाऱ्याच्या निर्देशानुसार लाच घेणाऱ्या मध्यस्थाकडून लाचेची रक्कम यशस्वीरित्या जप्त करण्यात आली.
राजस्थान आणि मध्य प्रदेशातील आरोपींच्या ३ वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.