इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय तपास ब्युरो (सीबीआय) ने दिल्ली पोलिसांच्या द्वारका उत्तर, दिल्ली येथील सहाय्यक उपनिरीक्षक (एएसआय) ला तक्रारदाराकडून ३५,००० रुपयांची लाच घेतांना अटक केली आहे.
सीबीआयने ८ जुलै रोजी आरोपी एएसआय आणि एका हेड-कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात आरोपी एएसआय आणि एका हेड-कॉन्स्टेबलने तक्रारदाराकडून त्याला आणि त्याच्या मित्राला बाजारात भाजीपाला दुकान चालवण्याची परवानगी देण्यासाठी आगाऊ ५० हजार रुपये आणि त्यानंतर दरमहा ५ हजार ते १० हजार रुपये लाच मागितली होती.
वाटाघाटीनंतर, दोन्ही आरोपींनी तक्रारदाराकडून ३५ हजार रुपये आगाऊ आणि प्रति व्यक्ती २ हजार रुपये मासिक लाच स्वीकारण्याचे मान्य केले.
सीबीआयने सापळा रचला आणि आरोपी एएसआयला रंगेहाथ पकडले. उपरोक्त आरोपी एएसआयला अटक करण्यात आली आहे.या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.