इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) उत्तर रेल्वेच्या चांदौसी येथील सहाय्यक विभागीय अभियंता आणि त्यांच्या कनिष्ठ ट्रॅकमनला तक्रारदाराकडून ३४ हजार रुपयांची लाच घेतांना अटक केली आहे.
आरोपी सहाय्यक विभागीय अभियंत्याने एका खाजगी कंपनीच्या १७ लाख ५७ हजार ६०५ रुपयांच्या प्रलंबित बिलांच्या मंजुरीवर ३४ हजार रुपयांचा म्हणजेच २ टक्के कमिशनची मागणी केल्याच्या आरोपावरून सीबीआयने ४ जुलै रोजी उत्तर रेल्वेच्या चांदौसी, संभळ, उत्तर प्रदेश येथील सहाय्यक विभागीय अभियंता यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. तक्रारदार एक खाजगी फर्म चालवतो आणि तो रेल्वे कंत्राटदार आहे. तक्रारदाराच्या फर्मला १९ जानेवारी २०२४ रोजी उत्तर रेल्वेच्या मुरादाबाद विभागाने रेल्वे ट्रॅक फिटिंगसाठी निविदा दिली होती.
सीबीआयने सापळा रचला आणि आरोपींना – सहाय्यक विभागीय अभियंता उत्तर रेल्वे आणि त्यांचा अधीनस्थ, ट्रॅकमन, यांना ४ जुलैच्या रात्री तक्रारदाराकडून ३४ हजार रुपयांची लाच मागताना आणि स्वीकारताना रंगेहाथ पकडले. सविस्तर चौकशीनंतर, दोन्ही आरोपींना ५ जुलैच्या सकाळी अटक करण्यात आली. अटक करण्यात आली.