इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अनुकूल तपासणी अहवाल देण्यासाठी १० लाख रुपयांची लाच घेतल्यानंतर लगेचच राष्ट्रीय वैद्यकीय आयोगात (एनएमसी) मूल्यांकनकर्ता म्हणून काम करणाऱ्या एका वरिष्ठ डॉक्टरला सीबीआयने अटक केली; छापेमारीदरम्यान ४४.६ लाख रुपये (अंदाजे) अतिरिक्त रोख रक्कम जप्त केली
कर्नाटकातील बेळगावी येथील त्यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या अनुकूल तपासणी अहवाल देण्यासाठी खाजगी व्यक्तींकडून १० लाख रुपयांची लाच घेतल्यानंतर लगेचच केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने राष्ट्रीय वैद्यकीय आयोगात (एनएमसी) मूल्यांकनकर्ता म्हणून काम करणाऱ्या एका आरोपी वरिष्ठ डॉक्टरला अटक केली आहे. छापेमारीदरम्यान ४४.६ लाख रुपये (अंदाजे) अतिरिक्त रोख रक्कम देखील जप्त करण्यात आली.
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगात (एनएमसी) मूल्यांकनकर्ता म्हणून काम करणाऱ्या एका वरिष्ठ डॉक्टरने त्यांच्या संस्थेच्या अनुकूल तपासणी अहवाल देण्यासाठी एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रतिनिधींकडून १० लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून सीबीआयने २४.०५.२०२५ रोजी सदर आरोपी आणि कर्नाटकातील बेळगावी येथील दोन खाजगी व्यक्ती आणि खाजगी वैद्यकीय संस्थेसह तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.
खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रतिनिधींकडून १० लाख रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर सीबीआयने सापळा रचला आणि आरोपीला रंगेहाथ पकडले. नंतर, आरोपी वरिष्ठ डॉक्टरला अटक करण्यात आली. कोलकाता, वर्धमान आणि बेळगावमधील अनेक ठिकाणी आरोपी सरकारी कर्मचारी आणि इतर खाजगी व्यक्तींच्या निवासस्थानांवर आणि अधिकृत जागेवर सीबीआयने झडती घेतली ज्यामध्ये ४४.६० लाख रुपयांची अतिरिक्त रोकड जप्त करण्यात आली आणि त्यात गुन्हेगारी कागदपत्रे आणि वस्तूंचा समावेश होता. या कारवाईदरम्यान जप्त केलेली एकूण रोख रक्कम ५४.६० लाख रुपये आहे..अटक करण्यात आलेल्या आरोपींना सक्षम न्यायालयात हजर केले जाईल.तपास सुरू आहे.