भुसावळ – येथील रेल्वेचे विभागीय कार्यालय अर्थात डीआरएम ऑफिसमध्ये सीबीआयच्या पथकाने धाड टाकत दोन अधिकार्यांना अटक केल्यामुळे खळबळ उडाली आहे. मंजूर निविदांची वर्क ऑर्डर देण्यासाठी २ लाख ४० हजार रुपयाची लाच स्वीकारतांना ही कारवाई झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. भुसावळ शहरात रेल्वेचे विभागीय कार्यालय अर्थात डीआरएम ऑफिसमध्ये आज दुपारच्या सुमारास सीबीआयच्या पथकाने धाड टाकली. यातील कारवाईचा पूर्ण तपशील समोर आला नसला तरी यात सिनियर डिव्हीजनल इंजिनिअर एम. ए. गुप्ता आणि मुख्य कार्यालयीन अधिक्षक संजीव रडे या दोन अधिकाऱ्यांना २ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारतांना रंगेहात पकडण्यात आले आहेत. नागपूर सीबीआयचे उपअधीक्षक एस.आर.चौगुले व उपअधीक्षक दिनेश तळपे या अधिकार्यांच्या नेतृत्वात हा सापळा यशस्वी करण्यात आला. मंजूर निविदांची वर्क ऑर्डर देण्यासाठी गुप्ता यांनी दोन लाख तर रडे यांनी ४० हजारांची लाच मागितल्याने मलकापूर येथील तक्रारदारो नागपूर सीबीआयडे तक्रार केली होती.