गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

ई-मेल फसवणुकीच्या प्रकरणाशी नायजेरियन नागरिकाला सीबीआयने केली अटक

by India Darpan
मार्च 6, 2025 | 7:17 pm
in संमिश्र वार्ता
0
cbi

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने ई-मेल फसवणुकीच्या प्रकरणाशी संबंधित प्रकरणात अदिया ओकोह या नायजेरियन व्यक्तीला अटक केली आहे. या नायजेरिअन नागरिकाला न्यायालयाने यापूर्वीच गुन्हेगार म्हणून घोषित केलेले आहे. या प्रकरणी सीबीआयने २७ जानेवारी २०१२ मध्ये भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 419, 420 सह 511 आणि 120 – B अंतर्गत तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 च्या कलम 66A (b) आणि (c) अंतर्गत हा गुन्हा नोंदवला होता.

या संदर्भातली तक्रार प्राप्त झाल्यानंतर सीबीआयने तपासाला सुरुवात केली होती. सीबीआयला प्राप्त तक्रारीनुसार तक्रारदाराला १७ जून २०११ रोजी एक फसवणूक करणारा ई-मेल आला होता. या तक्रारदाराच्या ई-मेल आयडीने ऑर्थोडॉक्स चर्च फाउंडेशनच्या सोडतीत 7,50,000 ग्रेट ब्रिटन पाऊंड (GBP) जिंकले असल्याचा खोटा दावा या ई-मेलमध्ये करण्यात आला होता. जिंकलेली ही रक्कम प्राप्त करण्यासाठी फसवणूक करणाऱ्यांनी तक्रारदाराकडून वैयक्तिक माहितीची मागणी केली तसेच, त्याला स्टेट बँक ऑफ इंडियातील खात्यात 16,700 रुपये जमा करण्यासाठीही प्रवृत्त केले. या प्रकरणातील ऑसिन डॅनियल या एका आरोपीला पोलीसांनी यापूर्वीच अटक केली होती, मात्र अदिया ओकोह याला अटक करण्यात यश आले नव्हते.

या प्रकरणात दि. 13 डिसेंबर 2015 रोजी या दोघांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यानंतर 14 ऑक्टोबर 2016 रोजी नवी दिल्लीमधील तीस हजारी न्यायालयाने अडिया ओकोह याला गुन्हेगार म्हणून घोषित केले आणि त्याच्याविरोधात लुक आऊट सर्क्युलरही (LOC) जारी करण्यात आले होते. दरम्यान अदिया ओकोह याच्या ठावठिकाणाबद्दल सीबीआयच्या हाती महत्वाची माहिती लागली. त्यानंतर तो भारतातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना मुंबई विमानतळावर त्याला ताब्यात घेण्यात आले. अटक केल्यानंतर त्याला दिल्ली इथे ट्रांझिट रिमांडवर नेले जात असून, त्याला पुढच्या कायदेशीर कार्यवाहीसाठी नवी दिल्लीतल्या राऊस अव्हेन्यू न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकमध्ये कुंभमेळासाठी महत्त्वपूर्ण स्थळांची जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांनी केली पाहणी…

Next Post

बिबट्याच्या हल्ल्यात ७ वर्षीय मुलाचा मृत्यू, वन विभागाला तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश…

Next Post
IMG 20250306 WA0382

बिबट्याच्या हल्ल्यात ७ वर्षीय मुलाचा मृत्यू, वन विभागाला तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश…

ताज्या बातम्या

jilha parishad

रणधुमाळी….नाशिक जिल्हा परिषदेत भाजपासमोर मागील कामगिरी टिकवून दाखवण्याचेच आव्हान

जून 19, 2025
cbi

४५ लाखाचे बनावट बिल…वैद्यकीय अधिका-यासह ८ खाजगी मेडिकल दुकानांच्या मालकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची मोठी कारवाई

जून 19, 2025
sepak takra action 00

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

जून 19, 2025
Untitled 58

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

जून 19, 2025
Untitled 57

पतीने बॉयफ्रेंडसोबत पत्नीला हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं, पत्नीने मारली १२ फूट उंच छतावरून उडी…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 19, 2025
संग्रहीत फोटो

राज्यात आता दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा…मंत्रालयात झाली बैठक

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011