इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने तक्रारदाराकडून १५,००० रुपये लाच मागितल्याबद्दल आणि स्वीकारल्याबद्दल उत्तर प्रदेशमधील गौंडा जिल्हयातील मानकापूर येथील आरपीएफ इन्स्पेक्टरला अटक केली आहे.
३० सप्टेंबर २०२४ रोजी मानकापूर रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या रेल्वे अपघातात त्याच्या भावाच्या मृत्यूबद्दल रेल्वे मेमो जारी करण्यासाठी तक्रारदाराकडून ५,००० रुपये लाच मागितल्याच्या आरोपावरून सीबीआयने १ मार्च २०२५ रोजी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. नंतर आरोपीने लाचेची मागणी १५,००० रुपये केली.
सीबीआयने सापळा रचला आणि आरपीएफच्या आरोपी निरीक्षकाला तक्रारदाराकडून १५,००० रुपये लाच मागितल्याबद्दल आणि स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर आरोपीला मार्च २०२५ रोजी अटक केली. त्यानंतर सीबीआय न्यायालय क्रमांक ६, लखनौ येथील भ्रष्टाचार विरोधी विभागाच्या विशेष न्यायाधीशांच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.