नवी दिल्ली – केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय अन्वेषण संस्थेला (सीबीआय) रोझी संगमा आणि सॅम्युएल संगमा यांच्या मृत्यू प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.
२४ जून रोजी गुडगाव येथील एका रुग्णालयात रोझी संगमा यांच्या मृत्यूशी संबंधित हे प्रकरण आहे. नंतर, रोझी संगमा यांचे नातेवाईक सॅम्युएल संगमा यांना वैद्यकीय दुर्लक्ष झाल्याचा संशय आल्याने त्यांची रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचार्यांशी बाचाबाची झाली. दुसर्या दिवशी, २५ जून रोजी दिल्ली पोलिसांना सॅम्युएल संगमा यांच्या मृत्यूविषयी माहिती मिळाली
रोझी संगमाचा रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला होता. तसेच सॅम्युएल संगमा यांच्या मृत्यूलाही रूग्णालयाचे कर्मचारी कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.