नवी दिल्ली – देशातील दोन माध्यम समुहावर टाकलेल्या छाप्यांमध्ये २४०० कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार आढळले आहेत,असा दावा प्राप्तीकर विभागाचे धोरण ठरविणऱ्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) केला. यामध्ये एका हिंदी वृत्तपत्र समुहाच्या २२०० कोटी आणि उत्तर प्रदेशातील एका वृत्तवाहिनी समुहामध्ये २०० कोटी रुपयांच्या व्यवहारांचा समावेश आहे. दोन्ही समुहांकडून जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांचा तापस सुरू आहे.
डीबीडीटीच्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. दोन्ही माध्यमसमुहांकडून अद्याप अधिकृत निवेदन प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. भोपाळमधील मुख्यालयातून माध्यम, ऊर्जा, वस्त्रोद्योग आणि स्थावर मालमत्ता या क्षेत्रात उद्योग सुरू होता.
समुहाचे वार्षिक उत्पन्न ६ हजार कोटी रुपयांहून अधिक असल्याचे सांगितले जात आहे. विविध व्यवसायात असलेल्या समुहाच्या कंपन्यांमध्ये २२०० कोटी रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याची माहिती प्राप्तीकर विभागाला मिळाली आहे. यामध्ये करचोरी आणि इतर कायदेशीर उल्लंघन केल्याचा तपास केला जाणार आहे. वृत्तवाहिनीचे मालक आणि सहकाऱ्यांच्या ठिकाणांवरून जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रे आणि डिजिटल नोंदणीत २०० कोटींची नोंदणी नसलेल्या आर्थिक व्यवहाराबाबत माहिती मिळाली आहे. अनेक कागदपत्रात समुहाचे नावही नाहीये.
वृत्तवाहिनीशिवाय समुहाचे उत्खनन, रुग्णालये, मद्य आणि स्थावर मालमत्तेसारेखे व्यवसायसुद्ध सुरू आहेत. सुरुवातीच्या तपासात ९० कोटी रुपयांचा अघोषित व्यवहार हाती आला आहे. तसेच अनेक बनावट व्यवसाय आहेत. त्या व्यवसायातून करचोरी झाल्याचा संशय आहे. या पैशांचा वापर बेनामी संपत्ती खरेदी करण्यासाठी केला जातो, असा दावा सीबीडीटीने केला आहे.
सीबीडीटीच्या दाव्यानुसार, प्राप्तीकर विभागाने हिंदी वृत्तवाहिनीच्या ठिकाणांवरून तीन कोटींहून अधिक रोख जप्त केले आहेत. बनावट कंपनींच्या नावावर ४० कोटींहून अधिक रकमेचा गैरव्यवहार प्राप्तीकर विभागाच्या हाती लागला आहे. या रकमेला कर्जाच्या स्वरूपात दाखविण्यात आले आहे.
कागदपत्रांमध्ये कंपनी, कर्मचार्यांची माहिती नाही, पत्ताही खोटा, ४ कोटी रुपयांचे शेअर्स तसेच वृत्तवाहिनी समुहाच्या अनेक कंपन्या नावालाच आहेत. त्यामध्येसुद्धा एकाही कर्मचार्याची माहिती नाही. पत्ताही खोटा आढळला आहे. वृत्तपत्र समुहाच्या समुहाच्या १०० हून अधिक कंपन्या समोर आल्या आहेत. त्यामध्ये कर्मचार्यांनाच कंपनीचे भागिदार आणि संचालकपदावर दाखविण्यात आले आहे. त्यांचा वापर पैशांची योग्यरित्या विल्हेवाट लावण्यासाठी केला जात होता. अनेक कर्मचारी या व्यवहारांबद्दल अनभिज्ञ असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.