शुक्रवार, डिसेंबर 5, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इन्कम टॅक्सची नवी वेबसाईट लॉन्च… अशी आहेत वैशिष्ट्ये… मिळतील या सर्व सुविधा

ऑगस्ट 27, 2023 | 5:31 am
in संमिश्र वार्ता
0
income tax pune e1611467930671

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – करदात्यांना अधिक सुविधा पुरवण्यासाठी आणि नव्या तंत्रज्ञानाच्या वेगासोबत ताळमेळ राखण्यासाठी प्राप्तिकर विभागाने www.incometaxindia.gov.in या आपल्या राष्ट्रीय वेबसाईटला नव्या रुपात उपलब्ध केले आहे, ज्यामध्ये वापरकर्त्यांना सोयीचे इंटरफेस, मूल्यवर्धित वैशिष्ट्ये आणि नव्या मॉड्युल्सचा समावेश आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (CBDT) अध्यक्ष नीतीन गुप्ता यांच्या हस्ते उदयपूर येथे प्राप्तिकर महासंचालनालयाच्या चिंतन शिबिरात या नव्या वेबसाईटचे उद्घाटन झाले. कर आणि इतर संबंधित माहितीचे एक सर्वसमावेशक भांडार म्हणून ही वेबसाईट काम करेल. थेट करविषयक कायदे, इतर अनेक संबंधित कायदे, नियम, प्राप्तिकर परिपत्रके आणि अधिसूचना, सर्व क्रॉस रेफरन्स आणि हायपरलिंक यांची माहिती या वेबसाईटवर उपलब्ध आहे. प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी करदात्यांना सोयीची होतील अशी अनेक टॅक्स टूल्स असलेले एक टॅक्सपेयर सर्विस मॉड्युल उपलब्ध करून देण्यात आले आहे.

मोबाईल फोनवर वापरण्यास सोयीची होईल, अशा प्रकारे नव्या वेबसाईटची आकर्षक रचना करण्यात आली आहे. या वेबसाईटवर आशयासाठी मेगा मेनू, अनेक नवी वैशिष्ट्ये आणि फंक्शन्सचा समावेश आहे. या वेबसाईटला भेट देणाऱ्या अभ्यागतांच्या सोयीसाठी या वेबसाईटवर नव्याने भर घालण्यात आलेल्या वैशिष्ट्यांची माहिती, एका गायडेड व्हर्चुअल टूरच्या मदतीने आणि नव्या बटण इंडिकेटर्सद्वारे देण्यात येते. नव्या कार्यप्रक्रियांमुळे वापरकर्त्यांना विविध कायदे, कलमे, नियम आणि करविषयक करार यांची तुलना करण्याची सोय उपलब्ध झाली आहे.

या साईटवर सुलभ हाताळणीसाठी सर्व संदर्भित आशय आता प्राप्तिकर विभागाच्या सेक्शनसह टॅग केला जातो. त्याशिवाय डायनॅमिक ड्यू डेट अलर्टच्या (विवरणपत्र दाखल करण्याच्या तारखेची आठवण करून देणारा इशारा) कार्यप्रक्रियेमुळे रिव्हर्स काऊंटडाऊन, टूलटिप्स आणि संबंधित पोर्टल्सच्या लिंक करदात्यांना सहजपणे अनुपालन करण्यासाठी उपलब्ध होतात. करदात्यांना अधिक जास्त सुविधा देण्यासाठी ही नव्या रुपातील वेबसाईट आणखी एक उपक्रम असून करदात्यांना प्रशिक्षित करणे आणि कर अनुपालनाच्या सुविधा देणे सुरूच ठेवले जाणार आहे.

CBDT launches revamped National Website of the Income Tax

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भारत – एक दर्शन (भाग १६)… हिंदुधर्माची व्यापकता

Next Post

परीक्षेवेळी तब्येत बिघडली… जिद्द सोडली नाही… थेट देशात पहिलीच आली… राशी पारखचे कौतुकास्पद यश…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
F4YEjjoWcAAALW2

परीक्षेवेळी तब्येत बिघडली... जिद्द सोडली नाही... थेट देशात पहिलीच आली... राशी पारखचे कौतुकास्पद यश...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011