नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आरडी सर्कल नाशिक येथे नाशिक केमिस्ट असोसिएशन आयोजित १० व्या अप्पासाहेब शिंदे क्रिकेट चषक स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्घाटन करताना छगन भुजबळ यांनी जोरदार फटकेबाजी केली.यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, अप्पासाहेब शिंदे यांनी केमिस्ट संघटनेचा पाया रचला. त्यांनी राज्यभरात अतिशय यशस्वी संघटन त्यांनी केले. आपल्या आमदारकीच्या काळात त्यांनी संघटनेच्या अनेक प्रश्नांची सोडवणूक केली असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, प्रत्येक संघटनेच्या यशासाठी संघटनेने असे विविध कार्यक्रम करून एकत्र येणे अतिशय आवश्यक असल्याचे सांगत स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.
यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दिपक जाधव, सचिव शरद धनवटे, नितीन वानखेडे, फार्मसी कौन्सिलचे अतुल अहिरे, रवींद्र पवार, देवरगांवकर यांच्यासह केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.