इंडिया दर्पण ऑनलाइन डेस्क – आवड म्हणून पाळल्या जाणाऱ्या प्राण्यांमध्ये मांजर हा अनेकांचा आवडता प्राणी असतो. मऊ, गुबगुबीत आणि देखणा असा हा प्राणी. या मांजरीला काही ठिकणी सटवाई म्हणून पूजलं जातं तर काही ठिकाणी तिचं आडवं जाणं अशुभ मानलं जातं. पण, आज आम्ही तुम्हाला अत्यंत अनोखी गोष्ट सांगणार आहोत. कर्नाटकात एक अनोखं मंदिर आहे जिथे मांजरींची पूजा केली जाते. असं मानलं जातं की, या मंदिरात गेल्या हजार वर्षापासून मांजरींची पूजा केली जाते.
मांजरीचं हे अनोखं मंदिर कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यापासून ३० किलोमीटर दूर बेक्कालेले गावात आहे. या गावाचं नाव कन्नडच्या बेक्कू शब्दावरून पडलं. ज्याचा अर्थ मांजर असा होतो. या गावातील लोक मांजरीला देवीचा अवतार मानतात. ते मांजरींची पूजा करतात. या गावातील लोक मांजरीला देवी मनगम्माचा अवतार मानतात.
स्थानिकांच्या श्रद्धेनुसार, देवी मनगम्माने मांजरीचं रूप धारण करून गावात प्रवेश केला होता आणि वाईट शक्तींपासून गावाचे संरक्षण केले होते. तेव्हापासूनच या गावातील लोक मांजरींची पूजा करतात. हे ऐकायला जरी वेगळं वाटत असलं तरी गावातील लोकांची मांजरींबाबत आत्मीयता आहे. इथे मांजरींना अशुभ मानलं जात नाही. कर्नाटकाच्या या गावातील लोक नेहमीच मांजरींची रक्षा करण्यावर विश्वास ठेवतात. या गावात जर कुणी मांजरीला नुकसान पोहोचवलं तर त्यांना गावातून बाहेर काढलं जातं. सोबतच मांजर मेली तर तिला विधीवत दफन केलं जातं.
Cat Temple in India Ancient Tradition
Karnataka Puja