नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रीय स्तरावरील संघटना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट)च्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी महाराष्ट्र चेंबरचे उत्तर महाराष्ट्र शाखा को- चेअरमन संजय सोनवणे, महिला संघटकपदी सौ. निलीमा पाटील, जॉईंट सेक्रेटरीपदी मेहुल थोरात यांची नियुक्ती केल्याचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सचिन निपूंगे यांनी जाहीर केले.
श्री संजय सोनवणे यांचा सामाजिक कार्यातील प्रदीर्घ अनुभव, संघटन कौशल्य, आणि अभ्यासू वृत्ती , सौ नीलिमा पाटील यांचा उद्योग व्यापार शेत्रात केलेले काम, आणि श्री मेहुल थोरात यांचा जेम ज्वेलरी सराफी, व्यावसायिक अनुभव चा कॅट या संघटनेला निश्चित फायदा होईल अशी खात्री श्री सचिन निपुंगे यांनी व्यक्त केली.
पद्यश्री बाबुभाई राठी सभागृह येथे महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, कॅटचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सचिन नीपुंगे यांच्या उपस्थितीत व्यापाऱ्यांच्या अडचणीं बाबत व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. स्वागत महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष सुधाकर देशमुख यांनी केले.
प्रास्ताविकात महाराष्ट्र चेंबरचे उत्तर महाराष्ट्र शाखा को- चेअरमन संजय सोनवणे यांनी महाराष्ट्र चेंबरची माहिती दिली व व्यापारी क्षेत्राच्या अडचणी सांगितल्या. सौ. नीलिमा पाटील यांनी आभार मानले. बैठकीस महाराष्ट्र चेंबरचे कार्यकारिणी सदस्य संजय राठी, राजेश मालपुरे, आशिष नहार,प्रफुल्ल संचेती, मिलिंद राजपूत, सचिन चव्हाण, चंद्रकांत सानप, घनशाम ठाकूर, उपस्थित होते.
CAT Nashik District Office Bearers Appointed