नवी दिल्ली – कॉमन अॅडमिशन टेस्ट यंदा २९ नोव्हेंबरला घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी थोडे दिवस राहिले असल्याने परीक्षा यंत्रणेतर्फे काही निर्देश दिले आहेत. हे सर्व निर्देश जाणून घेणे आवश्यक आहे.
- परीक्षा केंद्रावर जाताना मूळ ओळखपत्र नेणे आवश्यक आहे.
- पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड किंवा पासपोर्ट सोबत नेणे आवश्यक आहे.
- सदर परीक्षा तीन शिफ्टमध्ये आयोजित केली जाणार आहे. त्यात ८.३० ते १०.३० पहिली शिफ्ट, १२.३० ते २.३० दुसरी शिफ्ट आणि ४.३० ते ६.३० तिसरी शिफ्ट
- परीक्षा केंद्रावर अर्धा तास आधी उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
- देशभरातील १५६ परीक्षा केंद्रावर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
- कोरोनाचे संक्रमण वाढू नये यासाठी सर्व उपाययोजना केल्या जाणार आहेत.
- विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने परीक्षा केंद्रावर सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
- कोणत्याही कारणास्तव परीक्षा देण्यास उपस्थित राहू न शकलेल्या विद्यार्थ्यांना कोणत्याही सबबीवर परीक्षा देता येणार नाही असे मंडळाने स्पष्ट केले आहे.