मुंबई – बॉलीवूडचे आजच्या काळात हजारो तरुण-तरुणींना आकर्षण असते. सहाजिकच या चित्रपट सृष्टीत काम मिळावे म्हणून स्ट्रगल करण्यासाठी अनेक तरुण-तरुणी मुंबईत येतात, परंतु यात प्रत्येकजण यशस्वी होतो असे नाही. परंतु यात काम मिळावे आणि यशस्वी व्हावे यासाठी अनेक गैरप्रकार देखील चालतात, असे म्हटले जाते .त्यातूनच कास्टिंग काउच हा प्रकार गेल्या काही वर्षांपासून वाढला आहे असे म्हटले जाते.
कास्टिंग काउच ही बॉलिवूडमध्ये नवीन गोष्ट नाही. अनेकवेळा काम देण्याच्या बहाण्याने संघर्ष करणाऱ्या कलाकारांकडून सर्व प्रकारच्या मागण्या केल्या जातात. असेच आणखी एक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी एका अभिनेत्रीने मुंबई पोलिसांकडे तक्रार केली. तिने आरोप केला आहे की, निर्मात्याच्या भावाने आपल्याला काम मिळवून देण्याच्या बहाण्याने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केले आणि सेक्सच्या बदल्यात भूमिका देण्याचे आमिष दिले.
या अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर, मुंबई पोलिसांनी एका चित्रपट निर्मात्याच्या ३५ वर्षीय भावाला अटक केली आहे, या प्रकरणी पोलिसांनी आरे पोलिस ठाण्यात अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच मराठी मालिकेत काम करणाऱ्या एका अभिनेत्रीने ही तक्रार केली असल्याची माहिती मिळाली आहे.
गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमध्ये कास्टिंग काउचची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. केवळ संघर्ष करणाऱ्या अभिनेत्रींनाच नाही तर काही ज्येष्ठ अभिनेत्रींना कास्टिंग काउचचाही सामना करावा लागतो. वास्तविक त्या अभिनेत्रींना आपल्या कामाचा आपला ठसा उमटवला आहे. त्यापैकी अनेकांनी सोशल मीडियावर खुलेपणाने बोलून दाखवले तर अनेकांनी मुलाखतींमध्ये खुलासा करून सर्वांनाच माहिती दिली. त्यापैकी राधिका आपटे, कल्की केकाला, सुरवीन चावला आणि टिस्का चोप्रा यांचा समावेश आहे ज्यांना कास्टिंग काउचचा सामना करावा लागला आहे.