मुंबई – चित्रपटसृष्टीती कास्टिंग काऊचची अनेक प्रकरणे सातत्याने समोर येत असतात. आताही एक निंदनीय प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेने आज एक पत्रकार परिषद घेऊन सर्व प्रकार कथन केला आहे. पिडीत अभिनेत्रीनेच सर्व माहिती दिली आहे.
या नवोदित अभिनेत्रीने सांगितले की, राहुल तिवारी नावाची एक व्यक्ती आहे. त्याने २९ जुलैला मला फोन केला. तो एका हिंदी चित्रपटात भूमिका देणार होता. निर्मात्याला खुष करावं लागेल असे त्यानं सांगितले. मी त्याला नकार दिल्याने वारंवार फोन केले. अखेर माझ्या कुटुंबाशी चर्चा करुन मी त्याला धडा शिकविण्याचा निर्णय घेतला. त्याला होकार दिल्यानंतर त्याने मला फाऊंटन हॉटेलला बोलवलं. तुला रात्रभर एकटीला थांबावं लागेल, असं सांगितले. मला चार तार फिरवलं. पण मी जीपीएस लोकेशन शेअर केले असल्याने मनसेचे पदाधिकारी हॉटेलवर आले आणि त्यानंतर त्यांनी तिवारीला जाब विचारला. याचवेळी तिवारी आणि मनसैनिकांमध्ये झटापट झाली. त्यात तिवारी जबर मारहाण करण्यात आली.
बघा संपूर्ण पत्रकार परिषदेचा व्हिडिओ
https://www.facebook.com/662630549/videos/350979760064597/
https://twitter.com/chetanpatil1313/status/1420801207992406019