नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या विविध अभ्यासक्रमांचे प्रवेश प्रक्रिया सुरू झाले असून विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणी करिता अडचण होऊ नये म्हणून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नाशिक च्या वतीने अपूर्णता असलेल्या प्रकरणात पूर्तता करण्यासाठी विशेष मोहीम चे आयोजन केले आहे.महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सचिव श्री.सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त, डॉ. प्रशांत नारनवरे, महासंचालक, बार्टी श्री. सुनिल वारे यांच्या निर्देशानुसार नाशिक जिल्हयात राबविलेल्या मंडणगड पॅटर्णनूसार 12662 शैक्षणिक प्रकरणे समितीकडे प्राप्त झालेली होती, त्यापैकी 11474 प्रकरणांवर निर्णय घेण्यात आलेला आहे. नाशिक जिल्हयात मंडणगड पॅटर्णनूसार सर्व तालुक्यांमध्ये 27 शिबिरे घेण्यात आलेले आहेत.
दिनांक- 26 जून, 2023 ते 26 जुलै,2023 “ राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व ” अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मा.आयुक्त, समाजकल्याण,पुणे व मा. महासंचालक, बार्टी पुणे यांच्या निर्देशानुसार राज्यातील इयत्ता 12 वी विज्ञान शाखेतील सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नाशिक कार्यालयात जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रकरणे त्रृटी पुर्ततेअभावी अर्जदार स्तरावर प्रलंबित आहेत.
अर्जदारांनी नोंदणी केलेल्या ई-मेलवर CCVIS-II प्रणालीव्दारे त्रृटी कळविण्यात आल्या आहेत. मात्र अर्जदारांनी कागदपत्रे पुर्तता केलेली नाही. त्यामुळे त्यांची प्रकरणे त्रुटीपुर्ततेअभावी प्रलंबित आहे. अशा प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी दिनांक :- 05/07/2023 ते 06/07/2023 या कालावधीत “ राजर्षी शाहू महाराज जयंती पर्व ” अंतर्गत विशेष मोहिमेअंतर्गत अर्जदारांनी त्यांना ई-मेलवर कळविण्यात आलेल्या त्रुटीसंह व मुळ कागदपत्रांसह समिती कार्यालयाच्या नागरी सुविधा केंद्रात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10.00 ते सायंकाळी 04.00 या वेळेत उपस्थित राहावे. अर्जदारांकडून वरील कालावधीत त्रृटी पुर्तता न केल्यास त्यांच्या प्रकरणांवर नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.
“ आवाहन ”
“ कोणत्याही अर्जदाराने त्रयस्थ व्यक्तीकडे सपंर्क करु नये व त्रयस्थ व्यक्तिीच्या अमिशास बळी पडू नये. असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.”
५१ हजार वैधता प्रमाणपत्र निर्गमित
नाशिक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाल्यापासून दिनांक ०१/०८/२०२० ते ३०/०६/२०२३ या कालावधीत ऑनलाईन CCVIS-II प्रणालीद्वारे ५१८३१ जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आलेली आहेत.