भारतासह जगातील अनेक देशांमध्ये कोरोना संक्रमणामुळे दररोज हजारो मृत्यू होतात. बांगलादेशचे माजी पंतप्रधान खालिदा झिया यांनाही कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले. कोरोना साथीच्या आजारामुळे त्यांना वर्षभरापूर्वी तुरुंगातून तात्पुरते सोडण्यात आले होते.
दरम्यान, गेल्या चोवीस तासात मेक्सिकोमध्ये कोरोना विषाणूमुळे २१९२ लोकांचा मृत्यू झाला आहे. एवढेच नव्हे तर चोवीस तासांत इराणमध्ये २५८ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे कुठल्या देशात काय आहे स्थिती आहे, हे जाणून घेऊ या…
बांगलादेश : भारताचा शेजारी असलेल्या बांगलादेशात कोरनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाच्या प्रमुख खालिदा जिया यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. बांगलादेशच्या आरोग्य मंत्रालयाचे जनसंपर्क अधिकारी मदुल इस्लाम प्रधान यांनी सांगितले की, खलिदा झियाचा तपास अहवाल पॉझीटीव्ह आला आहे.
ब्राझील: ब्राझीलमध्ये गेल्या २४ तासांत कोरोना संक्रमणाने २६१६ लोकांचा मृत्यू झाला आहे. यासह, देशातील कोरोना साथीच्या आजाराने मरण पावलेल्या लोकांची संख्या वाढून एकूण ३५१३३४ झाली आहे. गेल्या २४ तासांत कोरोना संक्रमणाची ७१८३२ नवीन प्रकरणे नोंदली गेली असून संक्रमणाचा आकडा आता १३४४५००६ झाला आहे.
मेक्सिको : मेक्सिकोमध्ये गेल्या २४ तासांमध्ये कोरोना संक्रमणाने २१९२ लोकांचा मृत्यू झाला. एकाच दिवसात मोठ्या संख्येने साथीच्या आजाराचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. देशामध्ये या आजाराने आपला जीव गमावणाऱ्यांची संख्या सुमारे २१०००० झाली आहे. अमेरिका, ब्राझील आणि रशिया नंतर मेक्सिकन लोकांमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले.
इराण : गेल्या २४ तासांत इराणमध्ये कोरोना संक्रमणामुळे २५८ लोकांचा मृत्यू झाला आहे. यासह देशातील कोरोना साथीच्या आजारामुळे मृतांची संख्या वाढून ६४६९० झाली आहे. इराणमध्ये गेल्या चोवीस तासांत कोरोना संसर्गाची २१०६३ नवीन प्रकरणे नोंदली गेली असून देशात संक्रमित लोकांची संख्या २०७०१४१ झाली आहे.
अमेरिका : अमेरिकेत कोरोना संसर्ग रुग्णांची ३ कोटी ११ लाखांपेक्षा अधिक झाली आहे, तर आतापर्यंत पाच लाख ६१ हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनमध्ये कोरोना संक्रमणाचा आकडा सुमारे ४८ लाखांच्या पुढे गेला आहे तर तेथे १२७३२४ लोकांचा बळी गेला आहे.
चीन : चीनमध्ये काही प्रांतात याचा संसर्ग वाढत असून काही ठिकाणी मात्र कमी होत आहे. चिनी कोरोना लस किती प्रभावी आहे. याबद्दल वेळोवेळी प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता चीनचे अधिकारीच या लसी फसवणूकीची पोलखोल करत आहेत. या देशात विकसित कोरोना लस फार प्रभावी नाहीत. आता सरकार या लसी प्रभावी बनविण्यावर विचार करीत आहेत.