इंडिया दर्पण विशेष करिअरमाला
ऑप्टोमेट्री शंभर टक्के यश देणारे करिअर!
इंडिया दर्पण लाइव्ह डॉट कॉम आणि उत्तुंग करिअर मार्गदर्शन आयोजित ‘इंडिया दर्पण करिअरमाले’तील या व्हिडिओत विजय गोळेसर (मो 9422765227) यांनी ‘ऑप्टोमेट्री’ या करिअर विषयी सविस्तर मार्गदर्शन केले आहे. पॅरामेडिकल करिअर मधील पहिल्या पाच करिअर मध्ये ऑप्टोमेट्री या करिअरचा समावेश केला जातो. हल्ली प्रत्येक व्यक्ती सहा ते आठ तास मोबाइल बघतो. यात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा समावेश होतो. या लाइफस्टाईल मुळे प्रत्येकाला कधी ना कधी ऑप्टोमेट्रीस्टची पायरी चढावीच लागणार आहे. त्यामुळे या करिअरला भारतातच नाही तर सगळ्या जगात डिमांड येणार आहे. त्यामुळे विद्यार्थांनी बारावी सायन्स करून या करिअरचा विचार गंभीरपणे करायला हरकत नाही. ऑप्टेशियनच्या करिअरची माहिती देणारा हा व्हिडिओ विद्यार्थी व पालकांना निश्चित मार्गदर्शक ठरू शकेल. बघा हा व्हिडिओ