इंडिया दर्पण विशेष करिअरमाला
गॅरंटेड करिअरसाठी करा हॉटेल मॅनेजमेंट कोर्स!
दहावी बारावी नंतर खात्रीशीर जॉब मिळवून देणार्या करिअर्सची माहिती ‘इंडिया दर्पण करिअरमाले’त देण्यात येत आहे. दहावी किंवा बारावी केल्यानंतर हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केल्यास विद्यार्थांना १०० टक्के जॉब मिळू शकतो याची माहिती विजय गोळेसर यांनी या व्हिडिओत दिली आहे. हॉटेल मॅनेजमेंट कोर्स साठी पात्रता कोणती हवी असते तसेच दहावी व बारावी नंतर कोणते कोर्सेस किंवा डिप्लोमा करता येतात. त्यांचा कालावधी किती असतो. कोर्सेस केल्यानंतर कुठे जॉब मिळू शकतात, सुरूवातीला पगार किती मिळतो याचे सविस्तर मार्गदर्शन या व्हिडिओत करण्यात आले आहे. विद्यार्थी व पालकांनी हॉटेल मॅनेजमेंट कोर्सेसची माहिती जरूर घ्यावी. करिअर निवड करण्यासाठी हे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल. बघा हा व्हिडिओ