वंडरफुल करिअर इन फिल्म इंडस्ट्री!
इंडिया दर्पण लाइव्ह डॉट कॉम आणि उत्तुंग करिअर मार्गदर्शन आयोजित इंडिया दर्पण करिअरमालेत दहावी , बारावी नंतर जॉब ओरिएन्टेंड कोर्सेसची माहिती देण्यात येते. दहावी , बारावीनंतर विद्यार्थी फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश मिळविण्यासाठी आवश्यक असणारे अनेक शॉर्टटर्म कोर्सेस करू शकतात. फिल्म इंडस्ट्रीचे आकर्षण आपल्याकडं जवळ जवळ प्रत्येकाला असते.
चित्रपटाची मुहूर्तमेढ रचणाऱ्या दादासाहेब फाळके यांच्या कर्मभूमीत चित्रपट क्षेत्रांत यशस्वी होण्यासाठी आवश्यक त्या विषयांचे परिपूर्ण प्रशिक्षण देणार्या काही संस्था आहेत. विद्यार्थी व पालकांनी या संस्थांमध्ये जावून सर्व माहिती जाणून घ्यावी. आणि मगच आपल्या पाल्यांना या क्षेत्रांचे प्रशिक्षण द्यावे.
फिल्म इंडस्ट्रीत यशस्वी होण्यासाठी विद्यार्थांना मुळातच त्या फिल्डची आवड व इंटरेस्ट असणे आवश्यक असते. या व्हिडिओत विजय गोळेसर यांनी फिल्म इंडस्ट्रीत यशस्वी करिअर कसे करता येइल याचे सविस्तर मार्गदर्शन केले आहे. यश, कीर्ति आणि वैभव मिळवून देणार्या या आगळ्या वेगळया करिअर माहिती विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शक व उपयुक्त ठरेल अशी खात्री आहे. बघा हा व्हिडिओ
Career in Film Industry guidance video by Vijay Golesar