‘इंडिया दर्पण लाइव्ह डॉट कॉम’ आणि ‘उत्तुंग करिअर मार्गदर्शन’ आयोजित उत्तुंग करिअर कसे निवडावे? या विशेष करिअर मार्गदर्शन मालिकेत वंडरफुल करिअर या व्हिडिओत विजय गोळेसर (मो. 9422765227) यांनी आपल्याला योग्य होईल असे करिअर हसत खेळत कसे निवडावे आणि त्यात यशस्वी कसे व्हावे याचे मार्गदर्शन केले आहे.
दहावी नंतर करिअरच्या आणि शिक्षणाच्या असंख्य वाटा किंवा मार्ग उपलब्ध असतात. परंतु आपण कोणता मार्ग निवडावा हे विद्यार्थांना व पालकांनाही ठरविता येत नाही. या विशेष मार्गदर्शन मालिकेत विजय गोळेसर करिअरच्या नवीन संधींची माहिती तर देतीलच परंतु आपल्या पाल्यासाठी योग्य करिअर कसे निवडावे याचे देखील मार्गदर्शन करतील.
‘वंडरफुल करिअर’ या व्हिडिओत विजय गोळेसर यांनी पॉलिटेक्नीक या शैक्षणिक शाखेची उपयुक्तते विषयी सविस्तर माहिती दिली आहे
विद्यार्थांना व पालकांना इंडिया दर्पण लाइव्ह डॉट कॉम ची ही विशेष उत्तुंग करिअर मार्गदर्शन माला मार्गदर्शक ठरेल अशी खात्री आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचनांचे स्वागत आहे.
बघा हा व्हिडिओ