फॅशन डिझाइनिंग & इंटेरियर डेकोरेशन कोर्स
इंडिया दर्पण लाइव्ह डॉट कॉम आणि उत्तुंग करिअर मार्गदर्शन आयोजित इंडिया दर्पण करिअरमालेत दहावी , बारावी नंतर जॉब ओरिएन्टेंड कोर्सेसची माहिती देण्यात येते. दहावी , बारावी नंतर फॅशन डिझाइनिंग आणि इंटेरियर डेकोरेशन हे कोर्सेस विद्यार्थी करू शकतात. सध्या हे कोर्सेस केलेल्यांना भरपूर संधी उपलब्ध आहे.
या व्हिडिओत विजय गोळेसर यांनी फॅशन डिझाइनिंग आणि इंटेरियर डेकोरेशन विषयी सविस्तर मार्गदर्शन केले आहे.या क्षेत्रांचे ज्ञान विद्यार्थांना तसेच पालकांना देखील अत्यावश्यक आहे. फॅशन डिझाइनिंग आणि इंटेरियर डेकोरेशनचे अनेक क्लासेस आपल्या आसपास असतात परंतु हा विषय आपला नव्हेच असे समजून आपण सगळे या क्षेत्रांकडे दुर्लक्ष करतो. या जॉब मिळवून देणार्या कोर्सेसची माहिती विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शक व उपयुक्त ठरेल अशी खात्री आहे.
career fashion designing and interior decoration video