मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही वर्षात इंधनाचे भाव गगनाला भिडल्याने आता पेट्रोल डिझेलवर चालणारे वाहन वापरणे पडत नाही. अनेक जण इलेक्ट्रिक आणि सीएनजी वर चालणारी वाहने वापरतात. भारतात सध्या इंधन, इलेक्ट्रिक आणि सीएनजी इंजिनवर चालणारी वाहने वाढली आहेत. इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे अनेक जण इलेक्ट्रिक किंवा सीएनजी इंजिनचे वाहन घेण्याचा विचार करत आहेत. स्कोडा ही कार निर्माता कंपनी आता भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहने सादर करण्याच्या तयारीत आहे. पुढील काही वर्षांमध्ये देशात ग्रीन मोबिलिटी सेगमेंटमध्ये लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे. स्कोडा ऑटो इंडिया ब्रँडचे संचालक जॅक हॉलिस यांनी मात्र नजीकच्या भविष्यात सीएनजी वाहने सादर करण्याची कंपनीची कोणतीही योजना नसल्याचे सांगितले.
भारतात अनेक प्रकारची इलेक्ट्रिक वाहने लॉन्च केली जात आहेत, इलेक्ट्रिक वाहनांची वैशिष्ट्ये म्हणजे ती चालवण्यासाठी डिझेल पेट्रोलचा वापर केला जात नाही. तर इलेक्ट्रिक वाहने फक्त एका चार्जवर लांबपर्यंत अंतर कापतात, इंधन आणि CNG वाहनांच्या तुलनेत EV थोड्या महाग आहेत, मात्र इन-प्लेस( ठिकठिकाणी ) चार्जिंग स्टेशन नसल्यामुळे वाहन मालकाची काही गैरसोय होऊ शकते .
स्कोडा कंपनी देशात इलेक्ट्रिक वाहने (EVs) सादर करण्याचा विचार करत आहे भारतात दीर्घकालीन भविष्यासाठी योजना आखत असल्यामुळे कंपनीला EV विभागात प्रवेश करावा लागेल. सध्या असा अंदाज आहे की, 2030 पर्यंत बाजारपेठेतील 25-30 टक्के इलेक्ट्रिक कार असतील आणि त्याची खात्री करणे आवश्यक आहे, त्यामुळे आम्ही इलेक्ट्रिक वाहने बाजारात आणू, असे या कंपनीच्या संचालकांनी सांगितले. ऑडी आणि पोर्शे सारख्या कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेत हाय-एंड इलेक्ट्रिक वाहने ऑफर करण्यास सुरुवात केली आहे. स्कोडाच्या इलेक्ट्रिक वाहन लाँचच्या टाइमलाइनबद्दल विचारले असता, हॉलिस म्हणाले की, आम्ही टाईमलाइन देऊ शकत नाही, कारण ते अद्याप विचाराधीन आहे. मात्र सीएनजी मॉडेल सादर करण्याबाबत ते म्हणाले की, सध्या अशी कोणतीही योजना नाही.