नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भरधाव कारने दुचाकीला धडक देत दुचाकीवरील दाम्पत्याला फरफटत नेले. ही धक्कादायक घटना सटाणा येथे घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओद्वारे अक्षरशः अंगावर शहारे येत आहेत. याप्रकरणी कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर, जखमी दाम्पत्याला उपचारार्थ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत. बघा, हा थरारक व्हिडिओ