मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुणे -इंदुर महामार्गांवरील कुंदलगाव जवळ कारचा भीषण अपघात झाला. आज पहाटे झालेल्या या भीषण अपघातात १ जण जागीच ठार झाला तर ३ जण गंभीर जखमी झाले. या अपघातात भरधाव वेगाने जाणारी कार झाडावर जाऊन आदळली. अपघातातील जखमींना शासकीय रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे. चालकाचा नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला.