नाशिक – दिवाळीची सर्वत्र लगबग सुरु असतांना नेहरू गार्डन परिसरात सायंकाळी ७ च्या सुमारास चार चाकी वाहनाने अचानक पेट घेतल्यामुळे सर्वांचा गोंधळ उडाला. गाडीच्या इंजिनच्या पुढील भागात शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे बोलले जात आहे. ही घटना घडल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ गाडीत असलेल्या सर्वांना अगोदर बाहरे काढले. त्यानंतर पोलिस पोलीस व अग्निशामक दलाने त्वरित आग विझवल्यामुळे पुढील अनर्थ टळला नाशिकरोड येथील कुटुंबियांची ही कार होती. पती, पत्नी व मुले या गाडीत होते. शालिमार परिसरात दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांची खरेदी मोठी गर्दीं असतांना ही घटना घडली.