मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बॉलिवूड सेलिब्रिटी असो की क्रिकेट खेळाडू यांच्याविषयी सर्वसामान्य नागरिकांना नेहमीच कुतूहल आणि उत्सुकता असते. त्यांनी एखादी गोष्ट खरेदी केली तरी त्याची चर्चा होते. विशेषतः क्रिकेट खेळाडूंनी जर एखादी कार खरेदी केली तर त्यांची जास्त चर्चा होते. सध्या देखील नव्याने कर्णधार पदाची धुरा सांभाळली या खेळाडू विषयी चर्चा सुरू आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचा पूर्णवेळ कर्णधार बनला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारत सातत्याने जिंकत आहे. सध्या रोहित तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार बनला आहे. दरम्यान, टीम इंडियाच्या या नव्या कर्णधाराने नवी कार खरेदी केली आहे. एका रिपोर्ट्सनुसार, रोहितने लॅम्बोर्गिनी उरूस विकत घेतला आहे. या नवीन वाहनाची किंमत ४ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
एका रिपोर्ट्सनुसार, ही SUV ब्लू Elios च्या शेडने सुसज्ज आहे. त्यात निळा हा रोहितचा आवडता रंग आहे. त्याने आपल्या नवीन कारमध्ये काही नवीन वैशिष्ट्ये देखील आहेत. यामध्ये Sportivo लेदर इंटीरियर, 22-इंच डायमंड कट रिम्सचा समावेश आहे. रोहित शर्माने कारचे इंटीरियर स्वतःच्या आवडीनुसार केले आहे. त्यात लाल-काळा रंग केबिनचा आणि डॅशबोर्डचा आहे. दरम्यान आणखी एक क्रिकेट संबंधी आणखी एक महत्त्वाची घटना म्हणजे भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिकेतील पहिला कसोटी सामना शुक्रवारपासून मोहालीत खेळवला जाणार आहे. विराट कोहलीची ही 100 वी कसोटी असेल. चाहत्यांच्या दबावानंतर बीसीसीआयने 50 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला आहे, असे सांगितले. यापूर्वी हा सामना प्रेक्षकांविना होणार होता. 100वी कसोटी खेळणारा विराट टीम इंडियाचा 12वा खेळाडू ठरणार आहे. त्याच्या आधी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण, अनिल कुंबळे, कपिल देव, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, सौरव गांगुली, इशांत शर्मा, वीरेंद्र सेहवाग आणि हरभजन सिंग यांनी 100 हून अधिक कसोटी सामने खेळले आहेत.
Rohit ❣️ bought @Lamborghini Urus in color of Blue Eleos team India. The Worth of car is around 4 Cr INR !!#RohitSharma @ImRo45 #INDvSL pic.twitter.com/fIKonMfLHX
— Vishal. (@SPORTYVISHAL) March 1, 2022