नवी दिल्ली – पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आज दिल्लीत केंद्री गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यामुळे पंजाब काँग्रेसमध्ये आता भूकंप होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही दिवसांपूर्वीच सिंग यांना काँग्रेस श्रेष्ठींनी राजीनामा देण्यास भाग पाडले. त्यानंतर चरणजित सिंग चेन्नी यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यातच सिंग यांचे विरोधक समजले जाणारे नवज्योत सिंग सिद्धू यांच्याकडे पक्षाने काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपविली. मात्र, पंजाबमध्ये सत्ता स्थापन होताच सिद्धू यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पंजाब काँग्रेसमध्ये पूर्णपणे नाट्यमय घडामोडी घडत आहेत. पंजाबमध्ये येत्या काही महिन्यातच निवडणूक होणार आहे. अशा परिस्थितीत आता कॅप्टन अमरिंदर हे भाजपच्या वाटेवर असल्याने काँग्रेसला मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत.
https://twitter.com/ANI/status/1443193638175969285