इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कर्करोग नाव ऐकले तरी अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. जीवघेण्या आजारांपैकी एक असलेल्या कॅन्सरवर आता मात करता येणार आहे. केवळ एका इंजेक्शनद्वारे कॅन्सर बरा होऊ शकणार आहे.
जगभरात कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या दरवर्षी वाढत आहे. फुफ्फुसाच्या कॅन्सरची सर्वाधिक प्रकरणे पुरुषांमध्ये आणि स्तनाचा कॅन्सर महिलांमध्ये आढळतात. त्यामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. आजपर्यंत कॅन्सर रोखण्यासाठी कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नव्हती. या रोगाची बहुतेक प्रकरणे शेवटच्या टप्प्यात असतानाच समोर येताना पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत उपचार करणे हे डॉक्टरांसमोर एक आव्हान होते. अनेक प्रकरणांमध्ये रुग्णावर वर्षानुवर्षे उपचार सुरू राहतात. मात्र आता हा आजार रोखण्यात एक जालीम उपाय सापडला आहे.
अलीकडेच शास्त्रज्ञांनी कॅन्सरच्या उपचारासाठी एक इंजेक्शन विकसित केले आहे. ज्यामुळे या आजाराच्या उपचारात लागणारा वेळ कमी होऊ शकतो. इंजेक्शनद्वारे औषध देखील दिले जाईल, ज्यामुळे कॅन्सरच्या पेशी कमी होण्यास मदत होईल. मिळालेल्या माहितीनुसार, इंग्लंडमधील शास्त्रज्ञांनी हे इंजेक्शन विकसित केले आहे. इंग्लंडच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसने म्हटले आहे की, एटेझॉलिझुमॅब वाचे हे इंजेक्शन कॅन्सरच्या पेशींचा विकास रोखणार आहे. हे इंजेक्शन त्वचेखाली लावले जाईल. इंजेक्शन पूर्णपणे शरीरात इंजेक्ट करायलासात मिनिटे लागणार असून अवघ्या अर्ध्या तासात त्याचे काम सुरू होईल.
उपचारासाठी लागणारा वेळ वाचणार
पूर्वी कॅन्सरच्या रूग्णांमध्ये ड्रिपद्वारे औषध इंट्राव्हेनसद्वारे दिले जात होते. ज्यासाठी ३० मिनिटे किंवा एक तासही लागत होता. परंतु, हे इंजेक्शन थेट त्वचेवर लावले जाईल. यास फक्त सात मिनिटे लागतील. त्यामुळे कॅन्सरच्या उपचारात लागणारा वेळ वाचेल.
Cancer Treatment Injection London Scientist Research