इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – सर्व आजारांमध्ये कर्करोग हा जगासमोर आजही आव्हान ठरलेला आहे. वैद्यकीय विज्ञानात दररोज नवनवीन चमत्कार घडत आहेत. याचदरम्यान प्रत्येक रुग्ण कर्करोगापासून मुक्त व्हावा यासाठी एका औषधाचे परीक्षण करण्यात आले आहे. गुदाशयाच्या कर्करोग (Rectal Cancer)साठीच्या एका औषधाच्या परीक्षणामध्ये सहभागी झालेल्या १८ रुग्णांना कर्करोगातून मुक्ती मिळाली आहे.
न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, एका लहान निदान चाचणीत (क्लिनिकल ट्रायल) १८ रुग्णांनी जवळपास सहा महिने डोस्टरलिमॅब (Dostarlimab) नावाचे औषध सेवन केले. त्यानंतर प्रत्येक रुग्णाचा ट्यूमर कमी होत गेल्याचे दिसून आले.
डोस्टरलिमॅब हे औषध प्रयोगशाळेने रेणूंनी बनवले आहे. हे औषध मानवी शरीरात स्थानापन्न झालेल्या अँटीबॉडी म्हणून काम करते. सर्व १८ कर्करोगग्रस्तांना एकच औषध देण्यात आले. या उपचारांवर असा परिणाम दिसून आला की, सर्व रुग्णांमधील कर्करोग पूर्णपणे नष्ट झाला. अँडोस्कोपी, पॉजिट्रॉन अॅमिशन टोमोग्राफी किंवा पीईटी स्कॅन किंवा एमआरआय स्कॅन यासारख्या शारिरीक परीक्षणामध्ये कर्करोगाचे कोणतेही लक्षण आढळून आले नाही.
न्ययॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, आतापर्यंत निदान चाचणीत सहभागी झालेल्या रुग्णांना कर्करोगातून मुक्त होण्यासाठी किमोथेरेपी, रेडिएशन आणि आक्रामक शस्त्रक्रियाचा सामना करावा लागत होता. परिणामी आतडे, मूत्र आणि लैंगिक आजारही होऊ शकत होते. पुढील टप्प्यात यातून जातील म्हणून १८ रुग्ण चाचणीसाठी गेले. परंतु पुढे त्यांना उपचाराची गरज पडली नाही.
या परीक्षणातून जे परिणाम दिसून आले त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठामधील कोलोरेक्टल कर्करोगतज्ज्ञ म्हणून काम करणारे डॉ. अॅलन पी. वेनूक म्हणाले, की सर्व रुग्ण कर्करोगातून पूर्णपणे नष्ट होण्यासारखी गोष्ट अविश्वसनीय आहे. रुग्ण पूर्णपणे बरे होणारे हे जगातील पहिले संशोधन असेल. विशेष म्हणजे या औषधामध्ये कोणतेच साइड इफेक्ट नाहीत.
मेमोरियल स्लोन केटरिंग कर्करोग केंद्र आणि संशोधन पेपरचे सहलेखक डॉ. अँड्रिया सेर्सेक म्हणाल्या, कर्करोगातून मुक्त झालो आहोत असे ऐकताच सर्व रुग्णांच्या डोळ्यातून अक्षरशः आनंदाश्रू आले होते. औषधाचे पुनरावलोकन करणाऱ्या संशोधकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, हे उपचार खरोखरच आशेचा किरण दिसत आहेत. परंतु हे औषध बहुसंख्य रुग्णांवर परिणामकारक ठरेल का? कर्करोग खरोखरच नष्ट होईल का? यासाठी मोठ्या प्रमाणात परीक्षण करण्याची गरज आहे.
परीक्षणादरम्यान रुग्णांना सहा महिन्यात दर तीन आठवड्यात या औषधाची मात्रा देण्यात आली. परीक्षणामध्ये सहभागी झालेल्या कोणत्याच रुग्णाची किमोरेडिओथेरेपी किंवा शस्त्रक्रिया झालेली नव्हती. यादरम्यान कर्करोग गुद्दाशयातून शरीराच्या कोणत्याही भागात पसरला नाही. तसेच कोणत्याही रुग्णाची प्रकृती बिघडली नाही. अमेरिकेत डोस्टरलिमॅबच्या ५०० एमजीची मात्रेची किंमत आठ लाख रुपये (११ हजार डॉलर) आहे. ब्रिटेनमध्ये प्रतिमात्रा ५ हजार ८८७ पाउंड एवढ्या किमतीत उपलब्ध आहे.