शुक्रवार, ऑगस्ट 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

शासकीय कर्करोग रुग्णालयात ट्रू बीम लिनियर ॲक्सलरेटर प्रणालीचे लोकार्पण

by Gautam Sancheti
एप्रिल 27, 2025 | 6:39 pm
in संमिश्र वार्ता
0
WhatsApp Image 2025 04 27 at 1.12.50 PM 1 1024x682 1

छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय कर्करोग रुग्णालयातील ट्रू बीम युनिट या कर्करोगावरील अतिविशेष उपचार देणाऱ्या अत्याधुनिक यंत्र प्रणालीचे व कर्करोग संस्थेच्या इमारतीच्या विस्तारीत भागाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय आरोग्य, कुटुंब कल्याण व रसायने आणि खते मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या हस्ते आज करण्यात आले.

यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, इमाव कल्याण मंत्री अतुल सावे, राज्यसभा सदस्य खासदार डॉ. भागवत कराड, खासदार संदिपान भुमरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार सतिष चव्हाण, आमदार नारायण कुचे, आमदार अनुराधा चव्हाण, आमदार संजना जाधव, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, राज्य कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दर्पण जक्कल, वैद्यकिय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, संचालक डॉ. अजय चंदनवाले तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. त्यांनी मान्यवरांना यंत्रप्रणालीची माहिती दिली. राज्य कर्करोग संस्थेच्या विस्तारीत इमारतीचेही लोकार्पण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

ट्रू बीम लिनियर ॲक्सलेटर प्रणाली
-शासकीय कर्करोग रुग्णालयाच्या रेडिएशन ऑनकोलॅाजी विभागात ट्रू-बिम लिनियर अॅक्सलरेटर ही जागतिक दर्जाची अद्ययावत उपचार प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.
-रेडिएशन ऑनकोलॅाजी विभाग वर्ष १९८१ पासून कर्करूग्णांच्या सेवेत आहे.
-प्रामुख्याने मराठवाडा, विदर्भ, खान्देश व पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास १४ जिल्ह्यातील गरीब व गरजू रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात येतात.
-या रुग्णालयात महात्मा जोतीबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेतून मोफत उपचार केले जातात.
-वाढती कर्करुग्णसंख्या व अद्ययावत उपचारप्रणाली विकसित होत असल्याने महाराष्ट्र शासनाने दि.२१ सप्टेंबर २०१२ पासून स्वतंत्रपणे समर्पित कॅन्सर हॉस्पिटल सुरू करण्यात आले आहे.
-केंद्र सरकारने ऑक्टोबर २०१६ मध्ये राज्य कर्करोग संस्था म्हणून मान्यता दिली आहे.
दिवसेंदिवस कर्करुग्णसंख्या वाढत असल्यामुळे शासनाने रुग्णालयात ट्रू-बिम लिनियर अॅक्सलरेटर ही जागतिक दर्जाची अद्ययावत उपचार प्रणाली दि ३.१०.२०२४ पासून कार्यान्वित केली आहे.
-ट्रू बीम तंत्रज्ञानः-व्हेरियन ट्रूबीम (True Beam) हे अत्याधुनिक मेडिकल लिनियर अॅक्सलरेटर असून त्याची किंमत अंदाजे २५ कोटी रुपये आहे.
-ही प्रणाली अचूक, नावीन्यपूर्ण आणि प्रगत रेडिएशन उपचार प्रदान करते.
-हे संयंत्र इमेज-गाइडेड रेडिओथेरपी (IGRT) आणि (IMRT) यासह प्रगत उपचार पर्यायांची विस्तृत श्रेणी देते.
-ही लवचिकता डॉक्टरांना प्रत्येक रुग्णाच्या विशिष्ट गरजेनुसार क्लिष्ट ठिकाणी असणाऱ्या कर्करोगाच्या गाठीवर उपचार करण्यास सुलभता देते.
TrueBeam हे रूग्ण-केंद्रित उपचार मशीन आहे जे रूग्णाला आरामदायी आणि अत्यंत जटिल रेडिएशन योजना अचूकपणे वितरीत करून उपचार प्रदान करते.

यामुळे उत्कृष्ट कार्यक्षमतेने आणि सातत्यपूर्ण उच्च-गुणवत्तेचे उपचार केले जातात.
डोके आणि मान, मेंदू, स्तन, फुफ्फुस, अन्ननलिका, प्रोस्टेट आणि गर्भाशय यासह शरीरात कोठेही अत्यंत अचूक रेडिएशन उपचार प्रदान करते.
पिनपॉइंट पोझिशनिंग, उच्च-गुणवत्तेचे सीटी इमेजिंग आणि ३६०-डिग्री रोटेशनल ही वैशिष्ट्ये आहेत.
सीटी सिम्युलेटर (CT Simulator) तंत्र : – किरणोपचार विभागात रेडिएशन उपचार करण्यापूर्वी कर्करुग्णांचे 3D सिम्युलेशन करण्यासाठी LINAC संयंत्राचे संलग्न संयंत्र म्हणून सिटी सिम्युलेटर महत्वाचे आहे. सिटी इमेजेस वर कॅन्सर आजाराचे कंटूरिंग केल्यानंतर ट्रीटमेंट प्लॅनिंग करून Linac संयंत्रवर किरणोपचार केले जातात.
**

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शहरांचा चेहरा बदलल्यास ५० टक्के लोकसंख्येला उत्तम जीवन…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

राज्यातील या आठवड्यात तापमान कसे असणार…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
tapman

राज्यातील या आठवड्यात तापमान कसे असणार…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

ताज्या बातम्या

GxzEy8PW4AAqB 7

आरे आरे आरे, काय तुमची ही किंमत उद्धव ठाकरे…खा. नरेश म्हस्के यांचे हे ट्वीट चर्चेत

ऑगस्ट 8, 2025
rohit pawar

या वादग्रस्त नेत्यांचे पहिले राजीनामे घ्या..!…आमदार रोहित पवार यांनी केली मागणी

ऑगस्ट 8, 2025
crime11

वाहतूक दंडाच्या नावाने सायबर भामट्यांनी अनेकांचे बँक खाते केले रिकामे…आयटीअ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल

ऑगस्ट 8, 2025
modi 111

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात दूरध्वनीवरून संवाद…ही झाली चर्चा

ऑगस्ट 8, 2025
note

ठेवीदारांना मिळणार दिलासा…पैसे परत मिळवून देण्याची कार्यवाही गतीने करण्याचे गृह राज्यमंत्र्यांनी दिले निर्देश

ऑगस्ट 8, 2025
सोलापूरचे राजेंद्र अंकम यांना संत कबीर हथकरघा राष्ट्रीय पुरस्कार 2 1024x682 1

सोलापूरचे राजेंद्र अंकम यांना संत कबीर हथकरघा राष्ट्रीय पुरस्कार…

ऑगस्ट 8, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011