नवी दिल्ली – गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जगाला कोरोनाने ग्रासले आहे. मध्यंतरी संसर्ग घटला मात्र आता पुन्हा ओमिक्रॉनने धुमाकूळ घातला आहे. युरोपात गंभीर स्थिती असतानाच आता कॅनडात यापेक्षाही भयानक स्थिती झाल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे युरोपची स्थिती वाईट आहे. तर कॅनडातही कोविडच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. कॅनडामध्ये कोरोनाबाधित आरोग्य कर्मचार्यांनाही कामावर ठेवले जात असल्याचे काही जण सांगतात.
कॅनडाच्या क्यूबेक प्रांतात कोविडचा नवीन प्रकार ओमिक्रॉनपेक्षा वाईट आहे. 28 डिसेंबरपर्यंत, या प्रांतात 12,833 नवीन कोरोनाव्हायरस आढळले आहेत. कोरोना महामारीच्या काळात कॅनडातील कोणत्याही प्रांतातील एका दिवसातील ही सर्वाधिक प्रकरणे आहेत. आरोग्य अधिकार्यांनी इशारा दिला आहे की, तपासणी केंद्रांवर गर्दी असल्याने संसर्गाची वास्तविक संख्या जास्त असू शकते. अशा परिस्थितीत अनेक नागरिक घरीच जलद चाचणी किट वापरत आहेत. त्यामुळे काही प्रकरणे नोंदवली जात नसल्याची शक्यता आहे. तसेच, साथीच्या आजाराशी संबंधित रूग्ण वाढतच आहे, आरोग्याच्या पायाभूत सुविधांची कमतरता जाणवत आहे.
कोरोना विषाणूने त्रस्त झालेल्या या राज्यात कोविडची लागण झालेले आरोग्य कर्मचारीही कामात गुंतले आहेत. क्युबेक राज्याचे आरोग्य मंत्री ख्रिश्चन दुबे यांनी सांगितले की, आमच्याकडे कोणताही पर्याय शिल्लक नाही. ओमिक्रॉनच्या वाढत्या केसेसमुळे काही अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना कोविड पॉझिटिव्ह असूनही काम करण्याची परवानगी आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की, ओमिक्रॉनचा संसर्ग इतका वेगवान आहे की मोठ्या संख्येने आरोग्य कर्मचारी आजारी पडले आहेत. यामुळे राज्याच्या उपचारांच्या नेटवर्क क्षमतेला धोका आहे. त्यामुळे आम्ही ठरवले आहे की एका विशिष्ट स्थितीत, कोविड पॉझिटिव्ह कर्मचारी देखील आरोग्य व्यवस्थापनाच्या नियमानुसार काम करणे सुरू ठेवण्यास पात्र असतील.