नाशिक – नाशिक महानगरपालिकेच्या वतीने शववाहिका उपलब्ध होण्यासाठी दूरध्वनी क्रमांकाची व्यवस्था केली आहे. नाशिक शहरात नागरिकांना शववाहिका उपलब्ध होण्यास अडचण निर्माण होऊ नये.यासाठी मनपाच्या वतीने मनपाच्या -५,खाजगी -७ असे एकूण १२ शवाहिकांची व वैकुंठरथ-३, जनाजा रथ -२ अश्या एकूण १७ वाहनांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
शहरात नागरिकांसाठी शववाहिका उपलब्ध व्हावी यासाठी नागरिकांनी ०२५३-२५९२१०२ या संपर्क क्रमांकावर संपर्क केल्यास शववाहिका उपलब्ध होणार आहे. तरी नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन नाशिक महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.