इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मोबाइल युजर्ससाठी कॉल ड्रॉप ही एक मोठी समस्या अजूनही कायम आहे. ग्रामीण भागातच नव्हे, तर दिल्लीसारख्या शहरी भागातही कॉल ड्रॉपचा सामना करावा लागत आहे. वाईट नेटवर्कमुळे कॉलिंगच नव्हे तर इंटरनेट वापरण्यातही अडचणी येतात. अशा कोणत्याही समस्यांची तक्रार टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी (ट्राय) कडे केली जाऊ शकते. त्याशिवाय ट्रायचे TRAI MY Call हे अॅप उपलब्ध आहे. या अॅपवर कॉल ड्रॉप, केबल किंवा टीव्हीशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्यांची तक्रार करू शकतात. हे अॅप अँड्रॉइडसह आयओएससाठी उपलब्ध आहे.
तुम्ही केलेली तक्रार योग्य आणि खरी असेल, तर संबंधित टेलिकॉम कंपनीविरुद्ध कारवाई करण्याची तरतूद आहे. ट्रायने १ ऑक्टोबर २०१८ मध्ये एक नियम मंजूर केला आहे. त्याअंतर्गत कॉल ड्रॉपवर ५ लाख रुपयांचा दंड करण्याची तरतूद होती. या नियमानुसार, एका महिन्यात दोन टक्क्यांहून अधिक कॉल ड्रॉप झाल्यावर टेलिकॉम कंपन्यांवर ५ लाख रुपयांपर्यंत दंड लावण्यात येणार आहे.
१) सर्वप्रथम फोनमध्ये MyCall App डाउनलोड करावे.
२) त्यानंतर अॅप ओपन करून आवश्यक परवानगी द्यावी लागेल. त्यामध्ये कॉन्टॅक्ट्स, कॉल हिस्ट्री, मेसेज आणि लोकेशनचा समावेश आहे.
३) आता कोणाला तरी कॉल करा. किंवा कोणीतरी कॉल करेल याची वाट पाहा.
४) जसा एखादा कॉल डिस्कनेक्ट होईल तर त्वरित एक पॉप-अप विंडो समोर येईल. त्यामध्ये कॉल रेटिंगचा पर्याय असेल.
५) तसेच कॉल ड्रॉपचा पर्याय असेल. तुम्हाला कॉल ड्रॉप ही समस्या जाणवली असेल तर कॉल-ड्रॉप बटनावर टॅप करा.
६) त्यानंतर सबमिट बटनावर टॅप करा.
७) सबमिट बटन प्रेस केल्यानंतर तुमची तक्रार नोंदवली जाईल.