मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतातील व्यापारींचे राष्ट्रीय स्तरावर प्रश्नांचे व समस्यांचे निरसन करणारी अखिल भारतीय व्यापारी महासंघ दिल्लीच्या महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारी सचिवपदी म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष श्री बी सी भरतीया व व राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र केटचे अध्यक्ष सचिनभाऊ निवंगुणे यांनी मनमाड मधील युवा व्यापारी व आनंद सेवा केंद्रांचे अध्यक्ष कल्पेश बेदमुथा यांची महाराष्ट्र राज्याच्या कार्यकारी सचिवपदी निवड केली.
आपल्या मनमाड येथील धावत्या भेटीमध्ये त्यांनी जलद बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात येणाऱ्या काळामध्ये व्यापाऱ्यांमध्ये एकी असली तरच प्रगती शक्य आहे असे प्रतिपादन सचिन भाऊ निवंगुणे यांनी केले. अतीशय कमी वेळात यशस्वी मिटींग आयोजित केल्याने सचीनभाऊ यांनी मनमाड टीम केटचे अभिनंदन केले.याप्रसंगी मनमाड व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारिक, सराफ सुवर्णकार असोसिएशनचे अध्यक्ष अरुण भैया सोनवणे, संघटक सुरेशशेठ लोढा व्यापारी महासंघ खजिनदार मनोजभाऊ जंगम, उद्योगपती गुरुदिपसिंग कांत, आनंद लोढा, संदेश बेदमुथा, अभिजीत लोढा,चेतन संकलेचा,राकेश ललवाणी, संजूभाऊ मुथा राजुशेठ गुप्ता,योगेश भंडारी ,नितीनजी आहेरराव परेश बुरड, दीपक शर्मा ,कुमार मेहानी, प्रमोद भाबड, आदी उपस्थित होते. आभार कल्पेश बेदमुथा यांनी मानले.