इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – स्वत:च्या विवाहाशी संबंधित नेटीझनने विचारलेल्या एका प्रश्नाला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी बेधडक उत्तर दिले आहे. बिनधास्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या स्मृती इराणी या कायमच चर्चेत असतात. सध्या त्यांनी विवाहासंदर्भात दिलेल्या उत्तराने त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आस्क मी एनिथिंग असा प्रश्न त्यांच्या इस्टाग्राम स्टोरीवर विचारला होता. त्यावर त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. अनेक प्रश्नांची त्यांनी सडेतोड आणि हटके उत्तरे दिली आहेत. परंतु, त्यांना सर्वांत शेवटी एक खासगी प्रश्न विचारण्यात आला. तुमचे लग्न तुमच्या मैत्रिणीच्या पतीशी झाले आहे का? असा खोचक प्रश्न एका नेटिझनने विचारला. त्यावर स्मृती इराणी यांनी सविस्तर उत्तर दिले आहे.
स्मृती इराणी म्हणाल्या, “नाही. मोना या माझ्यापेक्षा १३ वर्षांनी मोठ्या आहेत. त्यामुळे त्या माझ्या ‘बचपन की सहेली’ कशा असतील? ती राजकारणी नाही. त्यामुळे तिला यात खेचू नका. माझ्याशी भांडा, माझ्याशी वाद घाला, माझी बदनामी करा पण राजकारणाशी काहीही संबंध नसलेल्या नागरिकाला तुमच्यासोबत गटारात ओढू नका. ती आदरास पात्र आहे.” स्मृती इराणी यांनी २००१ साली झुबिन इराणी यांच्याशी लग्न केले. या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. झुबिन यांच्या पहिल्या पत्नीचे नाव मोना आहे. त्या जोडप्यालाही एक मुलगी आहे.
पुरणपोळी… लय भारी!
आस्क मी एनिथिंगच्या खेळात स्मृती इराणींना अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावेळी त्यांना पुरण पोळी आवडते का? असाही प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी ‘लय आवडते’ असे मराठीतून उत्तर दिले.
cabinet minister smriti irani wedding friend husband
Ask me anything instagram Social Media