इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राज्याला तब्बल ४० दिवसांनंतर मंत्री मिळाले आहेत. आज सकाळी राजभवनात शपथविधी सोहळा संपन्न झाला. नव्या मंत्रिमंडळात दोन वादग्रस्त आमदारांना स्थान देण्यात आले आहे. त्यात शिंदे गटाचे दोन्ही आमदार आहेत. सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांचे नाव टीईटी परीक्षा घोटाळ्यात चर्चेला आले आहे. त्यांच्या दोन्ही कन्यांना या घोटाळ्यातच प्रमाणपत्र देण्यात आल्याचे पुढे आले आहे. तर, माजी मंत्री संजय राठोड हे पुजा चव्हाण या महिलेच्या मृत्यू प्रकरणाला जबाबदार असल्याचा आरोप आहे. या दोन्ही मंत्र्यांना कॅबिनेट मंत्री करुन एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस (ईडी) सरकारने मोठी निगरगट्टता आणि हिंमत दाखविल्याचा सूर सोशळ मिडियात उमटत आहेत. विशेष म्हणजे आता संजय राठोड यांना महिला विकास व बालकल्याण मंत्री तर अब्दुल सत्तार यांना शिक्षण मंत्री करून ईडी सरकारने अजून निगरगट्टता दाखवावी आणि महाराष्ट्राच्या जनतेला ठेंगा दाखवावा, अशा पोस्ट सध्या सोशल मिडियात धुमाकूळ घालत आहेत.
कारकिर्दीवर डाग असलेल्यांनाही मंत्री करताना एवढी निगरगट्टता आणि हिम्मत दाखवली आहेच
तर आता संजय राठोड यांना महिला बालकल्याण मंत्री आणि अब्दुल सत्तार यांना शिक्षण मंत्री करून अजून निगरगट्टता दाखवावी आणि महाराष्ट्राच्या जनतेला ठेंगा दाखवावा.— Prashant Kadam (@_prashantkadam) August 9, 2022
Cabinet Expansion Abdul Sattar Sanjay Rathod Controversy