शुक्रवार, सप्टेंबर 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

या राज्यात सेमीकंडक्टर युनिट स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

by Gautam Sancheti
मे 14, 2025 | 7:07 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
modi 111

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत आज इंडिया सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत आणखी एक सेमीकंडक्टर युनिट स्थापन करायला मंजुरी देण्यात आली.

देशात पाच सेमीकंडक्टर युनिट्स यापूर्वीच उभारणीच्या अंतिम टप्प्यात असून, या सहाव्या युनिटसह, भारत धोरणात्मकदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या सेमीकंडक्टर उद्योगाच्या विकासाच्या प्रवासात पुढले पाऊल टाकत आहे.

आज मंजूर झालेले युनिट एचसीएल आणि फॉक्सकॉनचा संयुक्त उपक्रम आहे. एचसीएलला हार्डवेअर विकसित करण्याचा आणि बनवण्याचा प्रदीर्घ इतिहास आहे. फॉक्सकॉन ही इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनातील जागतिक स्तरावरील मोठी कंपनी आहे. या दोन कंपन्या एकत्र येऊन जेवर विमानतळाजवळ येईडा (YEIDA), अर्थात यमुना एक्स्प्रेस वे औद्योगिक विकास प्राधिकरण येथे हा प्रकल्प उभारतील.

या प्लांटमध्ये मोबाइल फोन, लॅपटॉप, ऑटोमोबाईल्स, पीसी आणि डिस्प्ले असलेल्या इतर अनेक उपकरणांसाठी डिस्प्ले ड्रायव्हर चिप्स तयार केल्या जातील.हा प्लांट दरमहा 20,000 वेफर्स करता डिझाइन करण्यात आला असून, डिझाइन आउटपुट (उत्पादन) क्षमता दरमहा 36 दशलक्ष युनिट्स इतकी आहे. देशभरात आता सेमीकंडक्टर उद्योग आकाराला येत आहे. देशभरातील अनेक राज्यांमध्ये जागतिक दर्जाच्या डिझाइन सुविधा उभारण्यात आल्या आहेत. राज्य सरकारे डिझाइन कंपन्यांचा सातत्याने पाठपुरावा करत आहेत.

270 शैक्षणिक संस्था आणि 70 स्टार्टअप्समधील विद्यार्थी आणि उद्योजक नवीन उत्पादने विकसित करण्यासाठी जागतिक दर्जाच्या अद्ययावत डिझाईन तंत्रज्ञानावर काम करीत आहेत. या संस्थांमधील विद्यार्थ्यांनी विकसित केलेली 20 उत्पादने एससीएल (SCL) मोहालीने टेप आऊट केली आहेत.
आज मंजूर झालेले नवीन सेमीकंडक्टर युनिट 3,700 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करेल असा अंदाज आहे.

देश सेमीकंडक्टर च्या क्षेत्रात पुढे जात असताना, इको सिस्टीम भागीदारांनीही भारतात त्यांच्या सुविधा स्थापन केल्या आहेत. अप्लाइड मटेरियल्स आणि लॅम रिसर्च हे दोन सर्वात मोठे उपकरण उत्पादक आहेत. या दोघांचेही आता भारतात अस्तित्व आहे. मर्क, लिंडे, एअर लिक्विड, आयनॉक्स आणि इतर अनेक गॅस आणि रासायनिक पुरवठादार आपल्या सेमीकंडक्टर उद्योगाच्या विकासासाठी सज्ज झाले आहेत.

भारतात लॅपटॉप, मोबाइल फोन, सर्व्हर, वैद्यकीय उपकरणे, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, संरक्षण उपकरणे आणि ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाची झपाट्याने वाढ होत असल्यामुळे सेमीकंडक्टरची मागणी वाढत आहे. हे नवीन युनिट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनाला आणखी बळ देईल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांनी आज घेतली शपथ….

Next Post

धरणातील गाळ काढण्यासंदर्भात राज्याचे सर्वसमावेशक धोरण लवकरच…जलसंपदा मंत्र्यांनी दिले हे निर्देश

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

mahavitarn
स्थानिक बातम्या

नाशिकमध्ये विद्युत उपकेंद्रातील रोहित्र क्षमतावाढीचे काम सुरु…शनिवारी या भागातील वीजपुरवठा राहणार बंद

सप्टेंबर 12, 2025
jilha parishad
संमिश्र वार्ता

राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर…नाशिकचे आरक्षण या गटासाठी आरक्षित

सप्टेंबर 12, 2025
crime 13
क्राईम डायरी

इलेक्ट्रीकचा शॉक लागल्याने ४३ वर्षीय महिलेचा मृत्यू….लहवित येथील घटना

सप्टेंबर 12, 2025
IMG 20250912 WA0302 1
संमिश्र वार्ता

जागतिक पातळीवर नावाजलेल्या हाफकीन संस्थेस मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली भेट…

सप्टेंबर 12, 2025
crime11
क्राईम डायरी

डिजीटल अ‍ॅरेस्टचा बहाणा नाशिकच्या सेवानिवृत्तास सव्वा २१ लाख रूपयाला गंडा

सप्टेंबर 12, 2025
Untitled 13
संमिश्र वार्ता

नाशिकमध्ये शिवसेना मनसे तर्फे जन आक्रोश मोर्चा…खा. संजय राऊत, बाळा नांदगावकरही झाले सामील

सप्टेंबर 12, 2025
kangana
संमिश्र वार्ता

अभिनेत्री कंगना राणौतने सर्वोच्च न्यायालयातील दाखल केलेली याचिका घेतली मागे…हे आहे कारण

सप्टेंबर 12, 2025
Untitled 12
संमिश्र वार्ता

मेरे पास बंगला है, गाडी है, पैसा है, शोहरत है, तुम्हारे पास क्या है?….मेरे पास तेरे जैसे चार…नर्तकी पूजा गायकवाडचा व्हिडिओ व्हायरल

सप्टेंबर 12, 2025
Next Post
धरणातील गाळ तंत्रज्ञाबाबत बैठक 1 1024x768 1 e1747234918563

धरणातील गाळ काढण्यासंदर्भात राज्याचे सर्वसमावेशक धोरण लवकरच…जलसंपदा मंत्र्यांनी दिले हे निर्देश

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011