नवी दिल्ली – चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) ची परीक्षेबाबत द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटस ऑफ इंडिया ने मोठा खुलासा केला आहे. बिहार विधानसभेची होत असलेली पंचवार्षिक निवडणूक आणि विविध राज्यांमध्ये होत असलेल्या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूटने परीक्षा काही दिवसपुढे ढकलल्या आहेत. आता या परीक्षा १९, २१, २३ आणि २५ नोव्हेंबर रोजी होणार आहेत. तसेच, ज्यांना यावेळी परीक्षा द्यायची नाही ते पुढच्या वेळी परीक्षा देऊ शकतात, असेही इन्स्टिट्यूटने स्पष्ट केले आहे.