नवी दिल्ली – नोव्हेंबर २०२० मध्ये झालेल्या सीए इंटरमीडिएट परीक्षेचा निकाल रविवारी (ता. ८) सायंकाळी किंवा सोमवारी (ता. ९) घोषित होण्याची शक्यता आहे. या परीक्षेत प्रविष्ट झालेल्या विद्यार्थी आयसीएआय सीए इंटर रिझल्ट २०२० किंवा आयसीएआय सीए फाउंडेशन रिझल्ट २०२० संस्थांच्या संकेतस्थळांवर म्हणजेच icaiexam.icai.org या रिझल्ट पोर्टल किंवा caresults.icai.org यावर पाहू शकतील. सीएच्या अंतिम परीक्षेच्या निकालाची घोषणा आयसीएआयनं १ फेब्रुवारीला केली होती.
८,९ फेब्रुवारीला जाहीर होण्याची सूचना
सीए फाउंडेशनच्या नोव्हेंबर २०२० मध्ये झालेल्या आणि नोव्हेंबर २०२०मध्ये झालेल्या सीए इंटरमीडिएट परीक्षेचा निकाल ८ किंवा ९ फेब्रुवारीला केली जाईल, अशी माहिती आयसीएआयकडून शनिवारी नोटीस जारी करून देण्यात आली. सीए इंटरमीडिएट आणि फाउंडेशनच्या परीक्षांचा निकालाच्या घोषणेला आणखी थोडा कालावधी लागेल असं आयसीएआयचे संचालक धीरज खंडेलवाल यांनी ३ फेब्रुवारीला सांगितलं होतं.
असा पाहता येईल निकाल
सीए फाउंडेशन किंवा इंटरमीडिएटचा निकाल परीक्षा पोर्टलवर भेट दिल्यावर पाहू शकता येईल. प्रथम पोर्टलच्या होमपेजवर दिलेल्या रिझल्टच्या लिंकवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर त्या पेजवर आपला ६ अंकी रोल नंबर किंवा पिन नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर बॉक्समध्ये भरून सबमिट करावा लागेल. त्यानंतर विविध विषयात मिळालेले गुण पाहता येतील. स्कोअर कार्डचं प्रिंट घेण्याबरोबरच सॉफ्ट कॉपीही डाउनलोड करता येईल.