नाशिक – दी. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटेंट्स ऑफ इंडिया संस्थेच्या नाशिक सीए शाखेच्या नाशिक मधील अशोका मार्ग येथील आयसीएआय भवन येथे सीए इन्स्टिटयूट राष्ट्रीय अध्यक्ष सीए. निहार जांबूसरिया ३० जानेवारी रोजी भेट देणार आहेत. या कार्यक्रमात, नाशिकचे सीए सदस्य आणि विद्यार्थी यांच्याशी संवाद हा कार्यक्रमाचा एक भाग असेल. संस्थेचे केंद्रीय परिषद सदस्य आणि प्रादेशिक परिषद सदस्य देखील उपस्थित राहतील आणि त्याच वेळी माजी अध्यक्षांसोबत बैठक देखील आयोजित केली जाईल.
या कार्यक्रमात देशाच्या सध्याच्या अर्थव्यवस्था आणि करप्रणालीबद्दल आयसीएआय चे अध्यक्ष सीए. निहार जांबूसरिया आपले विचार मांडतील व कार्यक्रमावेळी पत्रकार परिषदही घेतली जाणार आहे. या कार्यक्रमासाठी नाशिक मधील जास्तीत जास्त सीए सभासदांनी व विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोदवून मोठ्या संखेने उपस्थित राहावे असे आव्हान आय.सी.ए.आय, नाशिकचे अध्यक्ष सीए राजेंद्र शेटे, तसेच उप अध्यक्ष सीए सोहिल शाह, सचिव सीए राकेश परदेशी, खजिनदार सीए संजीवन तांबूळवाडीकर, सीए पियुष चांडक, सीए रोहन आंधळे व सीए हर्षल सुराणा यांनी केले आहे.