नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन सोमवार ८ सप्टेंबर रोजी नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
राज्यपाल राधाकृष्णन यांचा दौरा असा : सोमवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता ओझर विमानतळ येथे आगमन होईल. शासकीय विश्रामगृह येथे सकाळी ११.४० ते दुपारी १२.१० या कालावधीत नाशिक जिल्ह्यातील खासदार, आमदार यांच्याशी संवाद साधतील. त्यांनतर ते नाशिक जिल्ह्यातील विविध यंत्रणांची आढावा बैठक घेतील.
दुपारी १.३० ते ४.२० वाजेपर्यंत विविध राजकीय पक्ष, संघटना प्रतिनिधी यांच्यासह विविध क्षेत्रातील तज्ज्ञाशी संवाद साधतील. दुपारी ४.४० वाजता ओझर विमानतळ येथून विमानाने पुढील कार्यक्रमस्थळाकडे राज्यपाल श्री. राधाकृष्णन प्रयाण करतील.