नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र विधानसभेच्या अंधेरी-पूर्व मतदार संघाच्या(१६६) रिक्त जागेसाठी ३ नोव्हेंबर २०२२ रोजी निवडणूक होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारिख १४ ऑक्टोबर २०२२ आहे. भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह ६ राज्यांतील विधानसभेच्या ७ रिक्त जागांसाठी पोट निवडणुकांचा आज कार्यक्रम जाहीर केला. शिवसेनेमध्ये मोठी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेसाठी राज्यात पोटनिवडणूक होणार आहे. त्यातच ही निवडणूक मुंबईतील मतदारसंघाची आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्नभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना, शिंदे गट, भाजप आणि अन्य राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे.
अंधेरी-पूर्व मतदार संघाचे आमदार रमेश लटके यांचे दुबई दौऱ्यावर असताना झालेल्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. विधानसभेच्या रिक्त जागेवर सहा महिन्याच्या आत पोटनिवडणूक घेणे बंधनकारक असते. त्यानुसार,अंधेरी-पूर्व विधानसभा मतदार संघासह बिहारमधील दोन तर हरियाणा,तेलंगणा,उत्तर प्रदेश आणि ओडिशा राज्यातील प्रत्येकी एक अशा एकूण ७ जागांसाठी ३ नोव्हेंबर २०२२ रोजी निवडणूक घेण्यात येणार असल्याचे भारत निवडणूक आयोगाने जाहीर केले असून ६ नोव्हेंबर २०२२ रोजी निकाल जाहीर होणार आहेत.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
या निवडणुकांसाठी ७ ऑक्टोबर रोजी निवडणूक अधिसूचना जारी होणार. १४ ऑक्टोबर ही अर्ज करण्याची अंतिम तारिख असून १५ नाव्हेंबर रोजी अर्जांची छाननी होणार. १७ ऑक्टोबर पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. ३ नोव्हेंबर रोजी मदतदान होणार असून ६ नोव्हेंबर २०२२ रोजी मतमोजणी होवून निकाल घोषित होतील. ८ नोव्हेंबर २०२२ रोजी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया संपणार आहे.
By poll Election State Assembly Constituency Declare