त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हरसुल पोलीस ठाणे हद्दीतील खरपडी घाटात खाजगी बस उलटून अंदाजे ३ प्रवासी गंभीर तर ३५ प्रवासी किरकोळ जखमी झाले. ही बस बस त्र्यंबकेश्वर ते धरमपुर जात असताना हा अपघात झाला… सर्व प्रवासी गुजरात राज्यातील अंजार कच भुज येथील रहिवासी आहेत. या बसचा क्रमांक GJ 03 BV 7058 हा आहे. गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यावेळी पोलिस अधिकारी बोडखे, झिरवाळ, पोलिस हवालदार मेघराज जाधव, तुंगार, शिंगाडे, बच्छाव, विलास जाधव स्थानिक ग्रामस्थानी मदत कार्य केले.