गुरूवार, जून 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकला ई-बस महामार्ग बसस्थानकात घुसली…महिला ठार, एक जखमी

by India Darpan
डिसेंबर 8, 2024 | 10:48 am
in संमिश्र वार्ता
0
IMG 20241208 WA0060 1

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुंबई नाका परिसरातील महामार्ग बस स्थानकात ई- बस अचानक बसस्थानकात घुसली. या अपघातात एक महिला ठार झाली तर एक जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघाता विषयी मिळालेली माहिती अशी की, शिर्डी येथून नाशिकला जाणारी ई बस (एम.एच.०४ एलक्यु ९४६२) महामार्ग स्थानकात शनिवार रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास फलाटावर चौकशी कक्षासमोर थांबली होती. चालकाने बस सुरू करताच बस थेट चौकशी कक्षावर धडकली. अपघातात आंध्रप्रदेशची महिला बसखाली सापडून जागीच ठार झाली. अंजली थट्टीकोंडा – नागार्जुन (२३, रा. पटछवा, जि. प्रकाशम, आंध्रप्रदेश) असे मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे.

शिर्डी ते नाशिक मार्गावर धावणारी ही बस होती. चालक उमेश दत्तात्रय भाबड (३२, रा. वेहळगाव, नांदगाव) यांनी बस फलाटावर थांबविली. बसमधून प्रवाशी खाली उतरल्यानंतर ते लॉक सीट एंट्री करण्यासाठी बसखाली उतरले. काम आटोपून भाबड पुन्हा बसमध्ये चढले. त्यांनी बस सुरू करताच जोरदार आवाज झाला अन् काही क्षणातच बसने अचानक उसळी घेतली. काही सेकंदाच लोखंडी बार तोडून बस थेट चौकशी कक्षाच्या भिंतीवर धडकली. याच दरम्यान चौकशी कक्षाजवळच्या ओट्यावरून पती मुपाल्ला नागर्जुन (३०, रा. कोंडीकंडर, जि. प्रकाशम) यांच्यासोबत चालत असलेल्या अंजली नागर्जुन यांना बसची जोरदार धडक बसल्याने त्यांचा मृत्यू झाला.

चौकशी खिडकीसमोर बसची माहिती घेण्यास उभे असलेले गोरक्ष मछिद्र गोसावी (५७, रा. पाथर्डीफाटा) हे धडकेत जखमी झाले आहे . या घटनेत चौकशी कक्षाची एका बाजूची भिंत पूर्णतः कोसळली आहे. हा प्रकार पाहताच स्थानकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गोसावी यांना जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. मुंबई नाका पोलिसांनी चालक भाबड यांना ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बँक मॅनेजर व खातेदारामध्ये फायटींग…बघा, हाणामारीचा व्हिडिओ

Next Post

विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी या १०६ सदस्यांनी सदस्यपदांनी घेतली शपथ

Next Post
Vidhan Sabha New 5 750x375 1

विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी या १०६ सदस्यांनी सदस्यपदांनी घेतली शपथ

ताज्या बातम्या

cbi

४५ लाखाचे बनावट बिल…वैद्यकीय अधिका-यासह ८ खाजगी मेडिकल दुकानांच्या मालकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची मोठी कारवाई

जून 19, 2025
sepak takra action 00

नाशिकमध्ये या तारखेला सेपक टकरा जिल्हा स्पर्धा आणि निवड चाचणी…

जून 19, 2025
Untitled 58

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

जून 19, 2025
Untitled 57

पतीने बॉयफ्रेंडसोबत पत्नीला हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडलं, पत्नीने मारली १२ फूट उंच छतावरून उडी…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 19, 2025
संग्रहीत फोटो

राज्यात आता दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा…मंत्रालयात झाली बैठक

जून 19, 2025
Untitled 56

डसॉल्ट एव्हिएशनचा रिलायन्सशी करार; फाल्कन २००० जेटसची नागपुरात होणार निर्मिती

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011