नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– जिल्ह्यातील ५०० हून अधिक बस या निवडणूक कामासाठी गुंतलेल्या असल्यामुळे गेले दोन दिवस प्रवाशांचे हाल झाले. मंगळवारी ग्रामीण भागासह लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द झाल्या. तर बुधवारी हीच स्थिती होती.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सोमवारी मुक्कामी गेलेल्या अनेक गाड्या परत येताच थेट डेपोत थांबल्या. त्यानंतर दुपारी जिल्ह्यातील विविध मतदार केंद्रावर या बस रवाना झाल्या. मंगळवारी कर्मचाऱ्यासह मतदान साहित्य घेऊन या बस मतदान केंद्राकडे रवाना झाल्या.त्यानंतर बुधवारी मतदान साहित्य व कर्मचाऱ्यांना परत स्ट्राँगरुमपर्यंत या कर्मचाऱ्यांना सोडविण्याची जबाबदारी एसटीवर आली. यामुळे मंगळवारी अनेक ठिकाणच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे बुधवारीही लांब पल्ल्यासह ग्रामीण भागातील काही फेऱ्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय झाली.