नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नवरात्र उत्सव सप्तशृंगी गडावर जादा वाहतुक ३ ते १२ आँक्टोंबर व कोजागिरी पौर्णिमा उत्सव ५. ते १७ आँक्टोंबर या कालावधीत राज्य परिवहन महामंडळा मार्फत करण्यात येणार आहे. या वाहतुकीसाठी वरील कालावधीत सुमारे ३०० बसेसचे नियोजन करण्यात आलेले आहे.
या कालावधीत जादा वाहतुक केंद्रे उभारण्यात आलेली आहे. नविन सीबीएस (ठक्कर), नांदुरी पायथा वाहनतळ, सप्तशृंगी गड वाहनतळ वरील ३०० बसेसव्दारे खालील नमुद मार्गावर वाहतुक करण्यात येईल. या व्यतिरिक्त नांशिक ते सप्तश्रृंगी गड मार्गावर विद्युत बस (ई बस) व्दारे ३० फे-या चालविण्यात येणार आहेत. तरी सदर फे-यांचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे. सकाळी ५ ते सायंकाळी ७.३० या कालावधीत फे-या उपलब्ध आहेत.
सुधारीत भाडे आकारणी पुढील प्रमाणे :-