इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – दसऱ्याच्या मुहूर्तावर देशभरात रावण दहनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अशातच हरियाणातील यमुनानगरमध्ये रावण दहन सुरू असताना मोठी दुर्घटना टळली. रावण दहनाच्या वेळी लोकांच्या गर्दीवर रावणाचा पुतळा पडला. रावणाचा पुतळा पडल्याने अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
वृत्तसंस्था एएनआयने यासंबंधीचा व्हिडिओ शेअर केला आहे. दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी उशिरा यमुनानगरमध्ये रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी रावण, मेघनाथ, कुंभकरण यांच्या पुतळ्यांचे दहन करण्यात आले. अचानक रावणाचा पुतळा लोकांच्या गर्दीवर पडला. रावण दहन कार्यक्रम पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. अशा स्थितीत रावणाचा पुतळा पडल्याने अनेक जण जखमी झाल्याच्या बातम्या येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमींना रुग्णालयात दाखल केले.
देशभरात दसरा उत्साहात साजरा झाला. दसरा किंवा विजयादशमी हा हिंदूंच्या प्रमुख सणांपैकी एक आहे. हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवितो. मान्यतेनुसार, या दिवशी भगवान श्रीरामाने रावणाचा वध केला आणि माँ दुर्गेने महिषासुराचा वध केला. हा दिवस अधर्मावर धर्माच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. पंजाब, उत्तराखंड, गुजरात, दिल्लीसह देशातील सर्व राज्यांमध्ये रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अभिनेता प्रभास आणि अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील लाल किल्ला मैदानावर रावणाचे दहन केले.
२०१८ मध्ये मोठा अपघात
पंजाबमधील अमृतसरमध्ये २०१८ मध्ये एक मोठा अपघात झाला होता. मानवला परिसरात रावण दहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती. अनेक लोक रेल्वे रुळांवर उभे रावण दहन पाहत होते. रावणदहनाच्या वेळी मोठ्या आवाजातील फटाक्यांच्या आवाजामुळे लोकांना रेल्वे रुळावर येण्याची कल्पना येऊ शकली नाही. लोकांना रेल्वेचा हॉर्न ऐकू येत नव्हता. भरधाव येणारी ट्रेन लोकांच्या अंगावरुन पुढे निघून गेली. रावण जळत राहिला आणि एकूण ६१ लोक मरण पावले. अशा स्थितीत हरियाणातील यमुनानगरचा हा अपघात धोकादायकही ठरू शकतो. मात्र हा अपघात टळला. मिळालेल्या माहितीनुसार, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
https://twitter.com/ANI/status/1577659299987234818?s=20&t=KxwrLV1Q7Ul_61qlaU2QFQ
Burning Ravan Effigy Collapse on Citizens Video